1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :(1) आकृती पूर्ण करा : (2)[आकृती : मध्यवर्ती चौकट – “पुस्तकाच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी”; तिच्याशी बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड…
1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) आकृती पूर्ण करा : (2)
[आकृती : मध्यवर्ती चौकट – “पुस्तकाच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी”; तिच्याशी बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]
सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या ! म्हणजे, जग असंही असतं तर......... ! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं ! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स !
आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं ! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची.
(2) कोठे ते लिहा : (2)
(i) लेखिकेची पुस्तकांच्या गराड्यात बसण्याची जागा –
(ii) पोपटांचे थवे उतरायचे ठिकाण –
(3) स्वमत : (3)
पुस्तकांची वाट पाहण्याचा लेखिकेचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.