Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper July 2025

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2025, July 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग-1 : गद्य 3 questions
विभाग-2 : पद्य 3 questions
विभाग-3 : स्थूलवाचन 3 questions
विभाग-4 : भाषाभ्यास 7 questions
विभाग-5 : उपयोजित लेखन 8 questions

July 2025 SSC Marathi (First Language) board paper

This is the Maharashtra Board Marathi First Language paper (paper code N 601) from July 2025. The paper is written in Marathi; this summary is in English. It is a 3-hour paper for 80 marks with five sections:

  • Prose: activities on two textbook passages and an unseen passage, which is also used later for the summary-writing option
  • Poetry: activities on the poem ‘आकाशी झेप घे रे’, questions on a poem of your choice, and a rasagrahan (appreciation) of given lines
  • Extensive reading: any two tasks, including thoughts on Sub-Inspector Rekha Mishra and a note on Girija Keer’s children’s plays
  • Language study: samas, shabdasiddhi, vakprachar, one-word substitutes, antonyms and synonyms, writing rules, punctuation marks and technical terms
  • Applied writing: a letter or a summary, an advertisement for a computer class, a news report on tree plantation at Morgaon, completing a story, and one long piece (an event, the autobiography of a farmer, or an essay on blood donation)

How to use it

Write the paper by hand in 3 hours, drawing the activity diagrams in pen as instructed. Then check each answer against the model answers, paying attention to spelling rules and grammar. For more Marathi practice, visit the SSC Marathi questions page.

FAQs

Is this paper free?

Yes, the paper and model answers are free.

Is this the Marathi Second Language paper?

No, it is the First Language paper. Other subjects are on the Maharashtra SSC exam hub.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग-1 : गद्य

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

    (1) आकृती पूर्ण करा : (2)

    [आकृती : मध्यवर्ती चौकट – “पुस्तकाच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी”; तिच्याशी बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]

    सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या ! म्हणजे, जग असंही असतं तर......... ! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं ! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स !

    आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं ! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची.

    (2) कोठे ते लिहा : (2)
    (i) लेखिकेची पुस्तकांच्या गराड्यात बसण्याची जागा –
    (ii) पोपटांचे थवे उतरायचे ठिकाण –

    (3) स्वमत : (3)
    पुस्तकांची वाट पाहण्याचा लेखिकेचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

    (1) उत्तरे लिहा : (2)
    (i) गुणवैशिष्ट्ये लिहा :
    [वन्यपशूंचे दात]
    (ii) कारण लिहा :
    सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली.

    सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेव्हाळ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरश: चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे.

    सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात “छोना, छोना तू काय कत्ते ?” असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.

    (2) कोण ते लिहा : (2)
    (i) पितळी पातेल्याची चाळणी करणारी –
    (ii) “छोना, छोना तू काय कत्ते ?” असे म्हणणारी –

    (3) स्वमत : (3)
    ‘पशूंनाही भावना असतात’ या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य : उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    [आकृतिबंध : मध्यवर्ती चौकट – “सृष्टीतील अद्वैत शिकविणाऱ्या बाबी”; तिच्याभोवती बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]

    ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुलं सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा ! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.

    (2) उत्तरे लिहा : (2)
    (i) अज्ञानामुळे जगात निर्माण होणारे –
    (अ) ......................
    (आ) ......................
    (ii) सर्वांसाठी असणारे सृष्टीतील घटक –
    (अ) ......................
    (आ) ......................

    4 marks See answer →

विभाग-2 : पद्य

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

    (1) तुलना करा : (2)

    पिंजऱ्यातील पोपटपिंजऱ्याबाहेरील पोपट
    (i) ......................(i) ......................
    (ii) ......................(ii) ......................

    आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा
    तुजभवती वैभव, माया
    फळ रसाळ मिळते खाया
    सुखलोलुप झाली काया
    हा कुटुंब वेड्या घेसी आसरा

    तुज पंख दिले देवाने
    कर विहार सामर्थ्याने
    दरि-डोंगर, हिरवी राने
    जा ओलांडूनी या सरिता-सागरा

    कष्टविण फळ ना मिळते
    तुज कळते परि ना वळते
    हृदयात व्यथा ही जळते
    का जीव बिचारा होई बावरा

    घामातुन मोती फुलले
    श्रमदेव घरी अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    हा योग जीवनी आला साजिरा

    (2) योग्य पर्याय ओळखा : (2)
    (i) सुखलोलुप झाली काया म्हणजे ..............
    (1) सुखाचा तिरस्कार वाटणे
    (2) सुखाबद्दल प्रेम वाटणे
    (3) सुखाचे आकर्षण वाटणे
    (4) सुख उपभोगण्याची सवय लागणे
    (ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ..............
    (1) काया सुखलोलुप होते
    (2) पाखराला आनंद होतो
    (3) आपल्या स्वसमर्थ्यांची जाणीव होते
    (4) आकाशाची प्राप्ती होते.

    (3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
    ‘घामातुन मोती फुलले
    श्रमदेव घरी अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    हा योग जीवनी आला साजिरा.’

    (4) काव्यसौंदर्य : (2)
    ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    ‘तू झालास मूक समाजाचा नायक’‘खोद आणखी थोडेसे’
    (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री
    (ii) प्रस्तुत कवितेचा विषय(ii) प्रस्तुत कवितेचा विषय
    (iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा.
    (i) मळवाट –
    (ii) बळ –
    (iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा.
    (i) आर्त –
    (ii) रिता –
    4 marks See answer →
  3. 2. (इ) खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा : (4 गुण)

    ‘सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
    कलंक मति चा झडो; विषय सर्वथा नावडो;’

    4 marks See answer →

विभाग-3 : स्थूलवाचन

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (1) सबइस्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  2. (2) खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.

    [आकृती : वरची चौकट – “सहसंबंध स्पष्ट करा”; खाली डावी चौकट – “‘बी’ चे झाड होणे”, उजवी चौकट – “माणसाचे माणूसपण जागे होणे”.]

    3 marks See answer →
  3. (3) टीप लिहा :

    गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष

    3 marks See answer →

विभाग-4 : भाषाभ्यास

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) समास : योग्य जोड्या लावा : (2)

    सामासिक शब्दसमासाचे नाव
    (i) काव्यामृतवैकल्पिक द्वंद्व समास
    (ii) बारभाईकर्मधारय समास
    द्विगू समास
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) शब्दसिद्धी : खालील तक्ता पूर्ण करा : (2)

    (कडवट, उपवास, चढाई, अचूक)

    प्रत्ययघटितउपसर्गघटितअभ्यस्त
    ..................................................................
    ..................................................................
    ..................................................................
    ..................................................................
    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (4)

    (i) अचंबित होणे –
    (ii) सार्थक होणे –
    (iii) प्रतीक्षा करणे –
    (iv) गुडघे टेकणे –

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1) (कोणतेही दोन सोडवा.)
    (i) अपेक्षा नसताना
    (ii) पसरवलेली खोटी बातमी
    (iii) उपकाराची जाणीव ठेवणारा

    (2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (i) सुपीक ×
    (ii) साक्षर ×

    (3) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
    (i) सूर्य =
    (ii) पाणी =

    (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    (जीवन व चरित्र हे शब्द वगळून)
    — जीवनचरित्र

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : (2)

    * खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा.)

    (i) शिक्षणामुळे माणुस सूसंस्कृत होतो.
    (ii) स्त्री ही स्वाभीमानी असली पाहीजे.
    (iii) ही फूले तिन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची आहेत.
    (iv) संतांनी ही मानवता आर्वजून शीकवली.

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) योग्य विरामचिन्हे ओळखा : (1)

    चिन्हेनाव
    (i) “ ”......................
    (ii) ,......................
  7. 4. (आ) (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (i) Goodwill —
    (ii) Mobile —

विभाग-5 : उपयोजित लेखन

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    ‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’
    ‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे
    योगासन शिबिर
    विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
    तज्ज्ञ प्रशिक्षक
    शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नाममात्र प्रवेश फी
    स्थळ – क्रीडासंकुल सभागृह क्र. 01
    दि. 15 जून ते 20 जून
    वेळ : सकाळी 7.00 ते 9.00
    संपर्क – sankul.nagar@gmail.com आयोजक

    (i) विद्यार्थी प्रमुख या नात्याने – तुमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

    किंवा

    (ii) विद्यार्थी प्रमुख या नात्याने – तुमच्या शाळेतील शारीरिक शिक्षकांची या शिबिरासाठी तज्ज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुलं सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा ! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण) (शब्दमर्यादा प्रकारानुसार 60 ते 90 शब्द)

    (1) जाहिरातलेखन : खालील शब्दांचा वापर करून आकर्षक जाहिरात तयार करा.

    [संगणक वर्ग] [काळाची गरज] [माफक फी] [सरावाची संधी]

    5 marks See answer →
  4. (2) बातमीलेखन : खालील विषयावर बातमी तयार करा.

    दि. 5 जून – पर्यावरण दिनानिमित्त ‘प्रगती विद्यालय’, मोरगाव येथे मा. मुख्याध्यापक यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

    5 marks See answer →
  5. (3) कथालेखन : खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. (दिलेली कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)

    आम्हां भावंडांचा खूप चर्चेंनंतर एकदाचा सहलीला जाण्याचा बेत पक्का झाला. सगळ्यांची मोट बांधेपर्यंत मेटाकुटीला आलो होतो. जाण्याचा दिवस उजाडला. अत्यंत उत्सुकतेने हसतखिडळत प्रवासाला सुरुवात झाली. नागमोडी वळणे घेत दाटीवाटीने असलेल्या झाडांमधून वाट काढत बस जात होती. अखेर पर्यटकांचे स्वागत करणारी ती कमान दिसली. कमानीतून बस आत शिरताच समोर पाहतो तर काय........................

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    अक्षरस्पर्श वाचनालय, पुणे
    आयोजित
    आंतरशालेय कथाकथन स्पर्धा
    पारितोषिक वितरण समारंभ
    सुप्रसिद्ध कथाकथनकार
    श्री. विनय परांजपे यांच्या हस्ते
    दि. 10 डिसेंबर स्थळ – अक्षरस्पर्श वाचनालय, कर्वे पथ, पुणे
    वेळ – दुपारी 4 वा

    वरील प्रसंगी तुम्ही पारितोषिक प्राप्त विद्यार्थी म्हणून उपस्थित होता अशी कल्पना करून वरील प्रसंगाचे वर्णन करा.

    8 marks See answer →
  7. (2) आत्मकथन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

    [आकृती : मध्यवर्ती चौकट – “शेतकरी”; भोवतीचे मुद्दे – जन्म व बालपण, शिक्षण, शेतीविषयी आवड, शेतीत नवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती व्यवसायास प्रतिष्ठा, उत्पन्नात वाढ, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन.]

    8 marks See answer →
  8. (3) ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →