1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :(1) उत्तरे लिहा : (2)(i) गुणवैशिष्ट्ये लिहा :[वन्यपशूंचे दात](ii) कारण लिहा :सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली.सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पि…
1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) उत्तरे लिहा : (2)
(i) गुणवैशिष्ट्ये लिहा :
[वन्यपशूंचे दात]
(ii) कारण लिहा :
सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली.
सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेव्हाळ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरश: चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे.
सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात “छोना, छोना तू काय कत्ते ?” असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.
(2) कोण ते लिहा : (2)
(i) पितळी पातेल्याची चाळणी करणारी –
(ii) “छोना, छोना तू काय कत्ते ?” असे म्हणणारी –
(3) स्वमत : (3)
‘पशूंनाही भावना असतात’ या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.