Skip to content
doubtly

1. (इ) अपठित गद्य : उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :(1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)[आकृतिबंध : मध्यवर्ती चौकट – “सृष्टीतील अद्वैत शिकविणाऱ्या बाबी”; तिच्याभोवती बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सार…

1. (इ) अपठित गद्य : उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

[आकृतिबंध : मध्यवर्ती चौकट – “सृष्टीतील अद्वैत शिकविणाऱ्या बाबी”; तिच्याभोवती बाणांनी जोडलेल्या चार रिकाम्या चौकटी.]

ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुलं सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा ! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.

(2) उत्तरे लिहा : (2)
(i) अज्ञानामुळे जगात निर्माण होणारे –
(अ) ......................
(आ) ......................
(ii) सर्वांसाठी असणारे सृष्टीतील घटक –
(अ) ......................
(आ) ......................

1 answer

Best answer

(1) मेघ (पाणी देऊन टाकतात), झाडे (फळे देऊन टाकतात), फुलं (सुगंध देऊन टाकतात), नद्या (ओलावा देऊन टाकतात) — तसेच सूर्य-चंद्र प्रकाश देतात.

(2) (i) (अ) अशांती (आ) द्वेष-मत्सर
(ii) (अ) आकाशातील तारे (आ) देवाचे जीवनप्रद वारे (जमीन, हवा, पाणी, प्रकाश).

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.