2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :(1) तुलना करा : (2)पिंजऱ्यातील पोपटपिंजऱ्याबाहेरील पोपट(i) ......................(i) ......................(ii) ......................(ii) ......................आकाशी झेप घे रे पाखरासोडी सोन्याचा पिंजरातुजभ…
2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) तुलना करा : (2)
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
|---|---|
| (i) ...................... | (i) ...................... |
| (ii) ...................... | (ii) ...................... |
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुटुंब वेड्या घेसी आसरातुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडूनी या सरिता-सागराकष्टविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावराघामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
(2) योग्य पर्याय ओळखा : (2)
(i) सुखलोलुप झाली काया म्हणजे ..............
(1) सुखाचा तिरस्कार वाटणे
(2) सुखाबद्दल प्रेम वाटणे
(3) सुखाचे आकर्षण वाटणे
(4) सुख उपभोगण्याची सवय लागणे
(ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ..............
(1) काया सुखलोलुप होते
(2) पाखराला आनंद होतो
(3) आपल्या स्वसमर्थ्यांची जाणीव होते
(4) आकाशाची प्राप्ती होते.
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा.’
(4) काव्यसौंदर्य : (2)
‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.