(i) अचंबित होणे – आश्चर्यचकित होणे.
वाक्य : लहानग्या मुलाचे अचूक गणित पाहून शिक्षक अचंबित झाले.
(ii) सार्थक होणे – सफळ होणे, यशस्वी होणे.
वाक्य : दिवाळीच्या मदतीच्या उपक्रमामुळे आमचे श्रम सार्थक झाले.
(iii) प्रतीक्षा करणे – वाट पाहणे.
वाक्य : सुट्टी संपल्यावर विद्यार्थी वर्षभर सहलीची प्रतीक्षा करतात.
(iv) गुडघे टेकणे – हार मानणे, नमते घेणे.
वाक्य : प्रतिस्पर्ध्याच्या कौशल्यापुढे त्याला गुडघे टेकावे लागले.