5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुलं…
5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)
विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवित आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुलं सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा ! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.