Skip to content
doubtly

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतून आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ह…

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतून आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा.

भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे, तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या, बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं.

(i) आकृती पूर्ण करा : (2)
[आकृती : मध्यभागी चौकट – ‘आगळ’ची वैशिष्ट्ये; तिच्याखाली चार रिकाम्या चौकटी, प्रत्येकाकडे बाण]

(ii) आकृती पूर्ण करा : (2)
[आकृती : वरची चौकट – उताऱ्यात आलेल्या खेळांची नावे; तिच्याखाली चार रिकाम्या चौकटी]

(iii) स्वमत : (3)
‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’, या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

1 answer

Best answer

(i) ‘आगळ’ची वैशिष्ट्ये : (1) सहा फुटांची लांब व पाऊण फूट रुंद, सागवानी लाकडाची; (2) एका भिंतीतल्या देवळीत आरपार जाऊन दरवाजा उघडण्या-लावण्यासाठी वापरली जाणारी; (3) दुपारी उन्हापासून व रात्री भीतीपासून संरक्षण देणारी; (4) दरवाजाचं व पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच.

(ii) खेळांची नावे : विटी-दांडू, भोवरा, गोट्या, भिंगऱ्या (तसेच चिंचोके, गजगं, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा).

(iii) स्वमत : पूर्वी गावात बातमीपत्र, वर्तमानपत्र अशी साधने नव्हती. संध्याकाळी सारी माणसं ढाळजीत जमत, गप्पा-गोष्टी रंगत. कोणाच्या घरी लग्न, कोणी पाहुणे आले, पिकाची काय स्थिती, गावात काय घडलं, अशा साऱ्या बातम्या तिथंच देवाणघेवाण होत. घराघरांत जे घडत होतं ते ढाळजीत एकत्र येऊन सर्वांना कळत होतं. म्हणूनच लेखकाला ढाळज हे गावाचं वर्तमानपत्र वाटतं.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.