Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper June 2026

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2026, June 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग-1 : गद्य 3 questions
विभाग-2 : पद्य 3 questions
विभाग-3 : स्थूलवाचन 1 questions
विभाग-4 : भाषाभ्यास 7 questions
विभाग-5 : उपयोजित लेखन 8 questions

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग-1 : गद्य

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतून आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा.

    भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे, तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या, बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं.

    (i) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : मध्यभागी चौकट – ‘आगळ’ची वैशिष्ट्ये; तिच्याखाली चार रिकाम्या चौकटी, प्रत्येकाकडे बाण]

    (ii) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरची चौकट – उताऱ्यात आलेल्या खेळांची नावे; तिच्याखाली चार रिकाम्या चौकटी]

    (iii) स्वमत : (3)
    ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’, या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो. त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच-सखल आडव्या-उभ्या रंगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते; पण बाकीच्या ऋतूंत संबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष त्यांकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषारांप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगांची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो, “नमस्ते!” मी उलट म्हणतो, “नमस्ते!” मग मी, गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालांवर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो!

    (i) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : मध्यभागी चौकट – “तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये”; तिच्याभोवती चार बाण – वर, खाली, डावीकडे व उजवीकडे – रिकाम्या जागा]

    (ii) उत्तरे लिहा : (2)
    (a) दिवसाच्या सुरुवातीला येणारे आवाज – ............
    (b) स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या – ............

    (iii) स्वमत : (3)
    प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

    ‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. स्वतःच्या कृतीबद्दल शंकाग्रस्त असलेली माणसे आणि कामाला सदैव तत्पर असलेली माणसे यांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे, पचवणे माणसाला जड जाते. प्रत्येकात एक सुप्तबुद्धी असते. आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली, ती जागृत झाली; तर हातून खूप मोठी कामे पार पडतात.

    (i) विधाने पूर्ण करा : (2)
    (a) येणाऱ्या अनुभवांना माणसे कशी सामोरी जातात यावर माणसांच्या ............
    (b) मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल, तर ............

    (ii) योग्य जोड्या लावा : (2)

    ‘अ’ गट‘ब’ गट
    (a) प्रत्येक माणसात असलेली(1) आत्मचरित्र
    (b) कामामुळे उत्पन्न होणारे(2) सुप्तबुद्धी
    (c) ‘अग्निपंख’(3) संपूर्ण बांधिलकी
    (d) यशस्वी माणसांचा गुणधर्म(4) ताणतणाव
    4 marks See answer →

विभाग-2 : पद्य

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
    खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
    मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
    ती मांडीवर घेते बाहुलीला
    एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
    भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर.
    बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
    खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
    मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
    अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
    मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
    मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
    तेव्हा तो हसून म्हणतो,
    ‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
    ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’
    मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
    उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
    नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
    मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
    तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
    मांडी घालून मुलगा बसतो गॅसमोर.
    दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
    मग शोधतो पातेलं भाजीसाठी......
    हळूहळू शिकेल तोही
    आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
    तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
    माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
    एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
    जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
    भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
    हातात हात असेल दोघांचाही
    ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

    (i) चौकटी पूर्ण करा : (2)
    (a) घराच्या झरोक्यातून पाहणारी – [ ]
    (b) चेंडूचे कसब दाखवणारा – [ ]
    (c) बाहुलीला थोपटणारी – [ ]
    (d) आभाळाला शिवून ओंजळीत येऊन पडणारा – [ ]

    (ii) कवितेतील खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा : (2)
    (a) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी – [ ]
    (b) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी – [ ]

    (iii) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा : (2)
    हळूहळू शिकेल तोही
    आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं

    (iv) काव्यसौंदर्य : (2)
    ‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात,
    हातात हात असेल दोघांचाही’
    या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    मुद्देवस्तू ←किंवा→ उत्तम लक्षण
    (a) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री........................
    (b) प्रस्तुत कवितेचा विषय........................
    (c) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ(a) स्नेह –
    (b) घर –
    (a) होड –
    (b) कार्य –
    4 marks See answer →
  3. 2. (इ) खालील पंक्तीचे रसग्रहण करा : (4 गुण)

    ‘घामातून मोती फुलले
    श्रमदेव घरी अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    हा योग जीवनी आला साजिरा’

    4 marks See answer →

विभाग-3 : स्थूलवाचन

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (i) ‘मधूचे कृत्य हे संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचे मत लिहा.

    (ii) ‘माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

    (iii) ‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

    6 marks See answer →

विभाग-4 : भाषाभ्यास

  1. 4. (अ) (i) समास : योग्य जोड्या लावा : (2)

    सामासिक शब्दसमासाचे नाव
    (a) भाजीपालाद्विगू समास
    (b) पंचपाळेकर्मधारय समास
    समाहार द्वंद्व समास
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (ii) शब्दसिद्धी : खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा : (2)

    (कडकड, दयाळू, अवगुण, शेजारीपाजारी)

    प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित शब्दअभ्यस्त शब्द
    2 marks See answer →
  3. 4. (अ) (iii) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा : (4)

    (a) कानोसा घेणे – (b) लळा लावणे –
    (c) खुणगाठ बांधणे – (d) कसब दाखवणे –

    4 marks See answer →
  4. 4. (आ) (i) शब्दसंपत्ती :

    (a) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
    (i) पृथ्वी – ............ (ii) नभ – ............

    (b) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (i) अंधार – ............ (ii) सुख – ............

    (c) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    विश्वासघात – [विश्वास व घात हे शब्द वगळून]

    (d) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
    (i) महिन्यातून प्रसिद्ध होणारे – ............
    (ii) उपकाराची जाणीव ठेवणारा – ............

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (ii) लेखननियमांनुसार लेखन : अचूक शब्द ओळखा (कोणतेही चार शब्द सोडवणे) : (2)

    (a) आशिर्वाद/आर्शीवाद/आशीर्वाद/आर्षिर्वाद
    (b) पूनर्वसन/पूर्णवसन/पुनर्वसन/पुनवंसन
    (c) कौटूंबिक/कौटुंबिक/कौटुंबीक/कोटुंबिक
    (d) क्रिडांगण/क्रीडांगण/क्रिडागंण/क्रीडागणं
    (e) क्षीतीज/क्षीतिज/क्षितीज/क्षितिज
    (f) पीढी/पिढी/पिढि/पीढि

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (iii) विरामचिन्हे : खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा : (1)

    (a) ?
    (b) ‘—’

  7. 4. (आ) (iv) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (a) Index – [ ]
    (b) Drama – [ ]

विभाग-5 : उपयोजित लेखन

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (i) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    निधी सेवा वाचनालय, कोल्हापूर.
    आयोजित
    राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
    स्पर्धा – दिनांक 17 मार्च वेळ – स. 9.00 वाजता
    पारितोषिक वितरण सोहळा – 17 मार्च, दु. 4.00
    प्रमुख पाहुणे – मा. डॉ. शुभांगी खरात
    अध्यक्ष – मा. श्री. अश्विन व्यास
    स्थळ – एस. एम. लोहिया सभागृह, करवीर नगरी, कोल्हापूर.
    संपर्क – आयोजक, निधी सेवा वाचनालय, कोल्हापूर
    E-mail – nidhiseva@gmail.com
    पराग/प्राची गुजर
    विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

    (1) विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.

    किंवा

    (2) तुमचा/तुमची मित्र/मैत्रिण अभय/स्मिता मोरे याचा/हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. more04@gmail.com या मेलवर त्यांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (ii) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    ‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. स्वतःच्या कृतीबद्दल शंकाग्रस्त असलेली माणसे आणि कामाला सदैव तत्पर असलेली माणसे यांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे, पचवणे माणसाला जड जाते. प्रत्येकात एक सुप्तबुद्धी असते. आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली, ती जागृत झाली; तर हातून खूप मोठी कामे पार पडतात.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) (i) जाहिरातलेखन : (5 गुण) [प्र. 5 (आ) – खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा; एकूण 10 गुण]

    योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (ii) बातमीलेखन : (5 गुण)

    खालील विषयावर बातमी तयार करा :

    ‘जनता विद्यालय’, कामठी येथे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजिरा करण्यात आला.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (iii) कथालेखन : (5 गुण) खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा :

    आंतरशालेय स्पर्धा – धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग – अजय शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू – स्पर्धेचा दिवस – सराव – स्पर्धेत चुरस – प्रतिस्पर्धी विनयही उत्कृष्ट खेळाडू – खरी चुरस – अजय व विनयमध्ये प्रत्यक्ष स्पर्धा सुरू – अचानक विनयचा पाय मुरगळणे – अजयचे स्पर्धा सोडून विनयच्या मदतीला धावणे – अजयला स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान – कौतुक.

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)

    (i) प्रसंगलेखन :

    भारतीय शिक्षण संस्था, पुणे
    आयोजित
    राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल जीवनधारा कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अतुल वैद्य यांचा भव्य सत्कार
    दि. 20 सप्टेंबर वेळ – दु. 4.00
    प्रमुख पाहुणे – श्री. अविनाश जगदाळे
    अध्यक्ष – श्री. विनय गानू

    भारतीय शिक्षणसंस्थेच्या माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणून तुम्ही या कार्यक्रमास उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (ii) आत्मकथन : (8 गुण) दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

    [आकृती : मध्यभागी चौकट – वर्गातील फळा; तिच्याभोवती चार चौकटी – वैशिष्ट्ये, महत्त्व/उपयोग, खंत, आनंद]

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (iii) वैचारिक : (8 गुण)

    ‘पाणी वाचवणे – काळाची गरज’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →