1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करा…
1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)
‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. स्वतःच्या कृतीबद्दल शंकाग्रस्त असलेली माणसे आणि कामाला सदैव तत्पर असलेली माणसे यांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे, पचवणे माणसाला जड जाते. प्रत्येकात एक सुप्तबुद्धी असते. आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली, ती जागृत झाली; तर हातून खूप मोठी कामे पार पडतात.
(i) विधाने पूर्ण करा : (2)
(a) येणाऱ्या अनुभवांना माणसे कशी सामोरी जातात यावर माणसांच्या ............
(b) मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल, तर ............
(ii) योग्य जोड्या लावा : (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| (a) प्रत्येक माणसात असलेली | (1) आत्मचरित्र |
| (b) कामामुळे उत्पन्न होणारे | (2) सुप्तबुद्धी |
| (c) ‘अग्निपंख’ | (3) संपूर्ण बांधिलकी |
| (d) यशस्वी माणसांचा गुणधर्म | (4) ताणतणाव |