Skip to content
doubtly

2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसूनखेळते आहे एक मुलगी केव्हाची.मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.ती मांडीवर घेते बाहुलीलाएका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचंभातुकलीच्या इवल्याशा गॅसवर.बाज…

2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅसमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी......
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

(i) चौकटी पूर्ण करा : (2)
(a) घराच्या झरोक्यातून पाहणारी – [ ]
(b) चेंडूचे कसब दाखवणारा – [ ]
(c) बाहुलीला थोपटणारी – [ ]
(d) आभाळाला शिवून ओंजळीत येऊन पडणारा – [ ]

(ii) कवितेतील खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा : (2)
(a) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी – [ ]
(b) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी – [ ]

(iii) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा : (2)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं

(iv) काव्यसौंदर्य : (2)
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात,
हातात हात असेल दोघांचाही’
या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

1 answer

Best answer

(i) (a) कवयित्री (मी) (b) मुलगा (c) मुलगी (d) चेंडू

(ii) (a) आत्मविश्वास व सर्वगुणसंपन्नता – मुलगी एकाच वेळी भाजी बनवणे व चेंडू झेलणे अशी दोन्ही कामे करू शकते, असा तिचा आत्मविश्वास.
(b) समता (स्त्री-पुरुष समानता) – मुलगा-मुलगी दोघांनीही सारे खेळ एकत्र खेळावेत, असा समतेचा विचार.

(iii) मुलगा बाहुलीला थोपटून झोपवतो व भाजी बनवायला शिकतो; हळूहळू तोही आपले कसब (खेळातले कौशल्य) दाखवत असतानाच घर सांभाळण्याचे काम शिकेल, असे कवयित्रीला वाटते.

(iv) कवयित्री मुलगी व मुलगा यांचा खेळ पाहताना भातुकलीच्या खेळातून वास्तवात प्रवेश करताना दोघांचेही हातात हात असावेत, असे म्हणते. ‘भातुकली’ हे बालखेळाचे प्रतीक, तर ‘वास्तव’ हे प्रौढ जीवनाचे प्रतीक आहे. आजच्या खेळात जे धडे (एकमेकांना साहाय्य, समान वाटा) ते उद्याच्या जीवनातही राहावेत, अशी तिची आशा आहे. ‘हातात हात’ ही प्रतिमा बंधुभाव व समतेचा विचार व्यक्त करते, म्हणून हे विचारसौंदर्य लक्षणीय आहे.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.