(a) कानोसा घेणे – हळूवार ऐकून माहिती घेणे.
वाक्य : चोरटी चर्चा ऐकण्यासाठी तो दाराशी जाऊन कानोसा घेऊ लागला.
(b) लळा लावणे – जिव्हाळा, प्रेम निर्माण करणे (आपलेसे करणे).
वाक्य : आमच्या शेजारच्या आजींनी गल्लीतल्या सर्व मुलांना लळा लावला आहे.
(c) खुणगाठ बांधणे – मनात ठरवून ठेवणे, लक्षात ठेवणे.
वाक्य : पुढील वर्षी प्रथम येण्याची खुणगाठ त्याने मनाशी बांधली.
(d) कसब दाखवणे – कौशल्य, हुशारी प्रकट करणे.
वाक्य : आंतरशालेय स्पर्धेत सुरेखाने रांगोळी काढण्याचे आपले कसब दाखवले.