5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)(i) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :निधी सेवा वाचनालय, कोल्हापूर.आयोजितराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धास्पर्धा – दिनांक 17 मार्च वेळ – स. 9.00 वाजतापारितोषिक वितरण सोहळा – 17 मार्च, दु. 4.0…
5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)
(i) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :
निधी सेवा वाचनालय, कोल्हापूर.
आयोजित
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
स्पर्धा – दिनांक 17 मार्च वेळ – स. 9.00 वाजता
पारितोषिक वितरण सोहळा – 17 मार्च, दु. 4.00
प्रमुख पाहुणे – मा. डॉ. शुभांगी खरात
अध्यक्ष – मा. श्री. अश्विन व्यास
स्थळ – एस. एम. लोहिया सभागृह, करवीर नगरी, कोल्हापूर.
संपर्क – आयोजक, निधी सेवा वाचनालय, कोल्हापूर
E-mail – nidhiseva@gmail.com
पराग/प्राची गुजर
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
(1) विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.
किंवा
(2) तुमचा/तुमची मित्र/मैत्रिण अभय/स्मिता मोरे याचा/हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. more04@gmail.com या मेलवर त्यांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.