Skip to content
doubtly

5. (अ) (ii) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा…

5. (अ) (ii) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

‘अग्निपंख’ या आपल्या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. स्वतःच्या कृतीबद्दल शंकाग्रस्त असलेली माणसे आणि कामाला सदैव तत्पर असलेली माणसे यांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे, पचवणे माणसाला जड जाते. प्रत्येकात एक सुप्तबुद्धी असते. आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली, ती जागृत झाली; तर हातून खूप मोठी कामे पार पडतात.

1 answer

Best answer

सारांश : डॉ. कलामांच्या मते, कामाशी संपूर्ण बांधिलकी हा यशस्वी माणसांचा समान गुण आहे. कामाचा ताण सहन करण्याची तयारी व अनुभवांना सामोरे जाण्याची वृत्ती यांवर कामाचा दर्जा ठरतो. मन व शरीर तयार असेल आणि आंतरिक इच्छेने सुप्तबुद्धी जागी झाली, तर मोठी कामे घडतात.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.