Chapter: Metallurgy· Science & Technology Part 1
उत्तर: एखादा धातू आणि एक किंवा अधिक धातू किंवा अधातू यांच्या एकजिनसी मिश्रणाला संमिश्र म्हणतात; उदा. पितळ व पोलाद.
मुख्य धातू वितळवून त्यात इतर मूलद्रव्ये ठरावीक प्रमाणात मिसळतात आणि मिश्रण थंड करतात. संमिश्राचे गुणधर्म मूळ धातूपेक्षा वेगळे (बहुधा अधिक चांगले) असतात, उदा. जास्त मजबुती, कठीणपणा किंवा क्षरणरोधकता.
उदाहरणे: पितळ (तांबे + जस्त), ब्राँझ / कासे (तांबे + कथील), पोलाद (लोखंड + कार्बन), स्टेनलेस स्टील (लोखंड + क्रोमिअम + निकेल).