Skip to content
doubtly

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्…

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे :

जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी॥

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.

चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ.

(1) चौकटी पूर्ण करा : (2)
(i) गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे – [ ]
(ii) मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत – [ ]

(2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने → [ ] , चैत्र , [ ]

(3) स्वमत : (3)
चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

1 answer

Best answer

(1) (i) पिंपळाची झाडे (ii) संत ज्ञानेश्वर

(2) फाल्गुन, चैत्र, वैशाख

(3) स्वमत : चैत्रात पिंपळाची जुनी पाने गळून जातात आणि त्यांच्या जागी नवी, कोवळी पालवी येते. सुरुवातीला जुनी-नवी पाने मिसळलेली असल्याने ती लक्षात येत नाही; पण सारी नवी पाने आल्यावर संपूर्ण झाड गहिऱ्या गुलाबी, रेशमासारख्या चकचकीत पानांनी भरून जाते. उन्हात ही भडक गुलाबी पाने चमकू लागली की झाडावर जणू सुंदर फुलांचे गेंदच फुलले आहेत असे वाटते. वाऱ्याच्या हलक्या झुळुकीनेही ही पाने सतत सळसळत राहतात, जणू झाड रेशमी पताका नाचवत वसंताचे स्वागत करत आहे. नवपालवीचे हे रूप पाहून मनाला ताजेपणा आणि नवचैतन्य मिळते; जुने गळून नवे उगवते हा निसर्गाचा संदेशही त्यातून मिळतो.

Doubtly AI · 24 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.