Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper March 2025

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2025, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 3 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 7 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

March 2025 SSC Marathi (First Language) board paper

This is the Maharashtra Board Marathi First Language paper (paper code N 701) from March 2025. The paper is written in Marathi; this summary is in English. It is a 3-hour paper for 80 marks with five sections:

  • Prose: activities on two textbook passages and an unseen passage, which is also used later for the summary-writing option
  • Poetry: activities on a poem extract, questions on a poem of your choice, and a rasagrahan (appreciation) of given lines
  • Extensive reading: any two tasks, including a note on Lieutenant Swati Mahadik and a paragraph on the etymological dictionary (vyutpatti kosh)
  • Language study: samas, shabdasiddhi, vakprachar, one-word substitutes, correct spelling, punctuation marks and technical terms
  • Applied writing: a letter or a summary, an advertisement for a yoga class, a news report about a school in Mahad, completing a story, and one long piece (an event, an autobiography of an object, or an essay on pollution)

How to use it

Write the paper by hand in 3 hours, drawing the activity diagrams in pen as instructed. Then check each answer against the model answers, paying attention to spelling rules and grammar. For more Marathi practice, visit the SSC Marathi questions page.

FAQs

Is this paper free?

Yes, the paper and model answers are free.

Is this the Marathi Second Language paper?

No, it is the First Language paper. Other subjects are on the Maharashtra SSC exam hub.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे :

    जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर
    वोळगे फळभार लावण्येसी॥

    ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.

    चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ.

    (1) चौकटी पूर्ण करा : (2)
    (i) गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे – [ ]
    (ii) मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत – [ ]

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने → [ ] , चैत्र , [ ]

    (3) स्वमत : (3)
    चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत‘माता’ म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ. स. 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती.

    रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही.

    (1) आकृती पूर्ण करा : (2)
    महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्ये → जटिल कार्य : ______ ; अटीतटीचे कार्य : ______

    (2) नावे लिहा : (2)
    (i) महर्षी कर्वे यांचे जन्मगाव............
    (ii) वाङ्मयाची जननी.............

    (3) स्वमत : (3)
    ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे,’ या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

    जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते.

    आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही.

    (1) खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा : (2)
    (i) तहान लागली की आपण सरबत पितो.
    (ii) काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात.
    (iii) व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते.
    (iv) थकवा आला की आपण काम करतो.

    (2) विधाने पूर्ण करा : (2)
    (i) ते न चुकता केले जाते, जे ..................
    (ii) आपण तेव्हा झोपतो, जेव्हा आपल्याला ..................

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
    खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
    मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यांतून.
    ती मांडीवर घेते बाहुलीला
    एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
    भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर.
    बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
    खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
    मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
    अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
    मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
    मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
    तेव्हा तो हसून म्हणतो,
    ‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
    ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’
    मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
    उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
    नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
    मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
    तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
    मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
    दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
    मग शोधतो पातेलं भाजीसाठी......
    हळूहळू शिकेल तोही
    आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
    तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
    माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
    एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
    जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
    भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
    हातात हात असेल दोघांचाही
    ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

    (1) कृती करा : (2)
    मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील दोन ओळी शोधून लिहा.

    (2) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा : (2)
    (i) घराचा झरोका
    (ii) भातुकलीचा खेळ.

    (3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
    ती मांडीवर घेते बाहुलीला
    एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं.

    (4) काव्यसौंदर्य : (2)
    ‘माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
    एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं’,
    या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    ‘उत्तमलक्षण’ किंवा ‘आकाशी झेप घे रे’

    (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री – (1)
    (ii) कवितेचा विषय – (1)
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – (2)

    4 marks See answer →
  3. 2. (इ) रसग्रहण : (4 गुण)

    खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :

    ‘तू झालास परिस्थितीवर स्वार
    आणि घडविलास नवा इतिहास
    तू झालास मूक समाजाचा नायक
    आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.’

    4 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. (1) ‘माणसे पेरा। माणुसकी उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ ‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेच्या आधारे सविस्तर लिहा.

    3 marks See answer →
  2. 3. (2) टीप लिहा :

    जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक

    3 marks See answer →
  3. 3. (3) खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.

    व्युत्पत्ती कोश → (i) निर्मितीचा ठराव (ii) निर्मितीची जबाबदारी (iii) कोशाचे प्रकाशन

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) (1) समास : योग्य जोड्या लावा : (2)

    सामासिक शब्दसमासाचे नाव
    (i) आईवडील(i) कर्मधारय समास
    (ii) पंचवटी(ii) समाहार द्वंद्व समास
    (iii) महाराष्ट्र(iii) द्विगू समास
    (iv) चहापाणी(iv) इतरेतर द्वंद्व समास
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) शब्दसिद्धी : खालील तक्ता पूर्ण करा : (2)

    (भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नाउमेद)

    प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द

    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा : (4)

    (i) निष्कासित करणे
    (ii) मुग्ध होणे
    (iii) पित्त खवळणे
    (iv) अचंबित होणे

    4 marks See answer →
  4. 4. (आ) (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
    (i) इतरांना मार्ग दाखवणारा –
    (ii) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे –

    (2) खालील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा : (1)
    आई – [ ] [ ]

    (3) खालील शब्दांचे वचन ओळखा : (1)
    (i) नदी –
    (ii) गोट्या –

    (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    दुकानदार – [दुकान व दार हे शब्द वगळून]

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : अचूक शब्द ओळखा (कोणतेही चार शब्द सोडवणे) : (2)

    (i) नीर्मीती/निर्मिती/नीर्मिती/निर्मीती
    (ii) सुशिक्षित/सुशीक्षीत/सूशिक्षित/सुशिक्षीत
    (iii) ऐतीहासीक/ऐतिहासीक/ऐतिहासिक/एतीहासिक
    (iv) परिस्थिती/परीस्थीती/परिस्थीती/परीस्थिती
    (v) दिपावली/दीपावलि/दीपावली/दिपावलि
    (vi) वीद्यापीठ/विद्यापिठ/वीद्यापिठ/विद्यापीठ

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) विरामचिन्हे : खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा : (1)

    (i) ?
    (ii) ,

  7. 4. (आ) (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (i) Drama
    (ii) Book Stall

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) (1) पत्रलेखन : (6 गुण) खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    अक्षरधारा वाचनालय
    चिपळूण
    यांच्यातर्फे
    शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा
    स्पर्धा – दि. 27 फेब्रुवारी, वेळ – स. 10.00
    स्थळ – अक्षरधारा सभागृह, चिपळूण.
    स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ – दुपारी 4.00
    संपर्क – ग्रंथपाल, अक्षरधारा वाचनालय
    akshardhara28@gmail.com

    यश/इरा गुप्ते

    (i) वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.

    किंवा

    (ii) तुमच्या मित्राला/मैत्रिणीला वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. ojas08@gmail.com या मेल आयडी वर हे पत्र पाठवा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते.

    आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) (1) जाहिरातलेखन : (5 गुण) (कोणत्याही दोन कृती सोडवा)

    योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : (5 गुण)

    ‘जनता विद्यालय, महाड’ या विद्यालयात नावीन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : (5 गुण) खालील अपूर्ण कथा पूर्ण करा :

    गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते. त्यासाठी वीस रुपये आईने केतनला दिले होते. केतनने पैसे पँटच्या खिशात ठेवले आणि तो निघाला. वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला होता. खेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि ...............

    5 marks See answer →
  6. 5. (इ) (1) प्रसंगलेखन : (8 गुण) (खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा)

    चित्रलीला निकेतन,
    अहमदनगर
    – आयोजित –
    आंतरशालेय चित्रकला स्पर्धा-पारितोषिक वितरण समारंभ
    दि. 24 डिसेंबर वेळ – दु. 4.00
    प्रमुख पाहुणे – श्री. अभय नगरकर – प्रसिद्ध चित्रकार

    वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावाचे/बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : (8 गुण) दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

    घटक : नदी — मुद्दे : भावना, उपयुक्तता/महत्त्व, आजची स्थिती, कार्य, खंत

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : (8 गुण)

    ‘प्रदूषण–समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →