1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत‘माता’ म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री न…
1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)
भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत‘माता’ म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ. स. 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही.
(1) आकृती पूर्ण करा : (2)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्ये → जटिल कार्य : ______ ; अटीतटीचे कार्य : ______
(2) नावे लिहा : (2)
(i) महर्षी कर्वे यांचे जन्मगाव............
(ii) वाङ्मयाची जननी.............
(3) स्वमत : (3)
‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे,’ या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.