Skip to content
doubtly

1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आह…

1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच-सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.

(1) कारणे लिहा : (2)
(i) झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण ..................
(ii) झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण ..................

(2) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा : (2)
(i) पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात –
(ii) आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो –
(iii) आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे –
(iv) आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल –

(3) स्वमत : (3)
शालेय विद्यार्थ्यांकडून लेखकाला असलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा.

1 answer

Best answer

(1) (i) झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं, म्हणून झाडाची पाने महत्त्वाची असतात.
(ii) झाडे लावणारी मुले वाढली तर देश निसर्गसंपन्न होईल व पुढच्या पिढ्यांना झाडांची सावली मिळेल, म्हणून.

(2) (i) चूक (ii) चूक (iii) बरोबर (iv) बरोबर

(3) स्वमत : लेखकाला शालेय विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी कार्टून्स व गाड्यांच्या नादी लागून न राहता आपल्या आसपासची झाडे, पक्षी व फुले ओळखायला शिकावे. घराभोवती झाडी लावावी, तिची काळजी घ्यावी आणि ‘झाडांचं वेड’ अंगी बाणवावे. झाडे हीच देशाच्या श्रीमंतीची खरी खूण आहे, हे जाणून प्रत्येक विद्यार्थ्याने निसर्गसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी. अशा मुलांनीच पुढे देश निसर्गसंपन्न व समृद्ध करायचा आहे.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.