Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper March 2026

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2026, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 3 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 7 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

March 2026 SSC Marathi (First Language) board paper

This is the Maharashtra Board Marathi First Language paper (paper code N 801) from March 2026, revised course. It is a 3-hour paper for 80 marks in five sections: prose (activities on two passages and an unseen passage, which is used again for the summary), poetry (activities on Sant Ramdas's Uttamlakshan, a table on a poem of your choice and a rasagrahan), extensive reading (any two tasks), language study (samas, shabdasiddhi, vakprachar, word wealth, spelling, punctuation, technical terms) and applied writing (letter or summary, advertisement, news report, story, and one long piece).

How to use it

Write the paper by hand in three hours, drawing the activity diagrams in pen as the instructions require, then check each answer against the model answers. Pay special attention to spelling rules and to the word limits for the writing tasks.

FAQs

Is this paper free?

Yes, the paper and its model answers are free.

Is this the Marathi Second Language paper?

No, it is the First Language paper (Marathi – 01).

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे.

    भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो ? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणे योग्य नाही का ? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे.

    (1) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : मध्यभागी असलेल्या चौकटीत «मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा» असे लिहिले आहे. त्या चौकटीकडे जाणाऱ्या चार बाणांवरील चार रिकाम्या चौकटी भरून आकृती पूर्ण करायची आहे.]

    (2) चौकटी पूर्ण करा : (2)
    (i) भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग – [ ]
    (ii) नदीसारखी प्रवाही – [ ]

    (3) स्वमत : (3)
    ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच-सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.

    (1) कारणे लिहा : (2)
    (i) झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण ..................
    (ii) झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण ..................

    (2) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा : (2)
    (i) पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात –
    (ii) आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो –
    (iii) आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे –
    (iv) आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल –

    (3) स्वमत : (3)
    शालेय विद्यार्थ्यांकडून लेखकाला असलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

    काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं ते सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.

    कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय ? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.

    (1) कृती करा : (2)
    [आकृती : «अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे» या चौकटीतून दोन बाण बाहेर पडले आहेत; दोन्ही ठिकाणच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत.]

    (2) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरच्या चौकटीत «इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी» असे लिहिले आहे. खाली तीन बाण आहेत; पहिली व तिसरी जागा रिकामी आहे, मधल्या जागी «सहकार्य» असे भरलेले आहे.]

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    श्रोतृ व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
    जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची ॥१॥

    वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखल्याविण खाऊं नये।
    पडिली वस्तु घेऊं नये। येकायेकीं ॥२॥

    जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
    पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं ॥३॥

    तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
    संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं ॥४॥

    आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
    शोधिल्याविण करूं नये। कार्य कांहीं ॥५॥

    सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
    पैज होड घालूं नये। कांहीं केल्या ॥६॥

    कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
    परपीडा करूं नये। विश्वासघात ॥७॥

    व्यापकपण सांडूं नये। पराधीन होऊं नये।
    आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी ॥८॥

    सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
    कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा ॥९॥

    अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाढवावी।
    विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची ॥१०॥

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    [आकृतिबंध : वरच्या चौकटीत «संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी» असे लिहिले आहे; खाली दोन बाण व दोन रिकाम्या चौकटी आहेत.]

    (2) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरच्या चौकटीत «कधीही करू नयेत अशा गोष्टी» असे लिहिले आहे; खाली चार बाण व चार रिकाम्या चौकटी आहेत.]

    (3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
    आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
    शोधिल्याविण करूं नये। कार्य कांहीं ॥

    (4) काव्यसौंदर्य : (2)
    खालील काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा :
    ‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    ‘भरतवाक्य’ किंवा ‘आश्वासक चित्र’
    (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री –..................
    (ii) प्रस्तुत कवितेचा विषय –..................
    (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे..................

    (प्रत्येकी अनुक्रमे 1, 1, 2 गुण)

    4 marks See answer →
  3. 2. (इ) खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा : (4 गुण)

    ‘तुझे शब्द जसे की
    महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
    तुझा संघर्ष असा की
    काठ्यांच्या सांगणी व्हाव्यात’.

    4 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. (1) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.

    3 marks See answer →
  2. 3. (2) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे ‘वीरांगना’ पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  3. 3. (3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) (1) समास : योग्य जोड्या लावा : (2)

    सामासिक शब्दसमासाचे नाव
    (i) नीलकमलद्विगू समास
    (ii) नवरात्रकर्मधारय समास
    वैकल्पिक द्वंद्व समास
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) शब्दसिद्धी : दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा : (2)

    (कारागिरी, हुरहुर, लाललाल, अतिरेक)

    प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित शब्दअभ्यस्त शब्द
    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा : (4)

    (i) सटकी मारणे
    (ii) कान देऊन ऐकणे
    (iii) पित्त खवळणे
    (iv) अचंबित होणे

    4 marks See answer →
  4. 4. (आ) (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
    (i) घर –
    (ii) नदी –

    (2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (i) रात्र ×
    (ii) हजर ×

    (3) खालील शब्दांचे वचन बदला : (1)
    (i) पुस्तक –
    (ii) झाडे –

    (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    इमानदार – [इमान व दार हे शब्द वगळून]

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा : (2) (कोणतेही चार शब्द सोडवणे)

    (i) सहानूभूती/सहानुभूती/सहानुभुती/सहानुभूति
    (ii) अभिव्यक्ती/अभीव्यक्ती/अभिव्यक्ति/अभीव्यक्ति
    (iii) क्रियाशिल/क्रीयाशील/क्रियाशील/क्रीयाशिल
    (iv) किर्तन/किर्तन/कीर्तन/कीर्तन
    (v) शिरोधार्य/शीरोधार्य/शीरोधार्य/शिरोधार्य
    (vi) आशिर्वाद/आर्शीवाद/आशिर्वाद/आशीर्वाद

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) खालील विरामचिन्हे ओळखा : (1)

    विरामचिन्हेनाव
    (i) ?
    (ii) !
  7. 4. (आ) (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (i) Bio-data
    (ii) Mobile

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    ज्ञानसागर पुस्तकालय
    104, प्रगतीनगर,
    नाशिक

    वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर
    25% विशेष सवलत

    सवलत दिनांक – 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर
    वेळ – सकाळी 9 ते रात्री 8
    साप्ताहिक सुट्टी – बुधवार

    त्वरा करा ................... त्वरा करा ................... त्वरा करा ...................

    संपर्क – व्यवस्थापक, ज्ञानसागर पुस्तकालय, नाशिक
    E-mail – dnyansagar4@gmail.com

    भाग्येश/भाग्यश्री शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

    (i) शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

    किंवा

    (ii) पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना राबवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं ते सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.

    कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय ? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे ‘फळांच्या दुकानाची’ आकर्षक जाहिरात तयार करा. (5 गुण)

    [मुद्दे : ताजी व स्वच्छ — सर्व प्रकारची फळे उपलब्ध — घरपोच सुविधा — माफक दर — ग्राहक समाधान]

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : खालील विषयावर बातमी तयार करा : (5 गुण)

    ‘ज्ञानदीप विद्यालय’, वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा : (5 गुण)

    शालेय सहलीचे नियोजन – विद्यार्थ्यांमध्ये उत्साह – प्रत्यक्ष सहलीचा दिवस उजाडणे – सहलीला सुरुवात – गाडीचा डोंगर-दऱ्यांतून प्रवास – अचानक पाऊस – चालकाचे प्रसंगावधान – विद्यार्थ्यांचे सहकार्य – वैशिष्ट्यपूर्ण, अविस्मरणीय प्रसंग – एकाचे दर्शन.

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    आंतरशालेय कबड्डी स्पर्धा
    पारितोषिक वितरण समारंभ

    दि. 24 डिसेंबर वेळ – दु. 4.00

    प्रमुख पाहुणे – श्रीमती रेखा विचारे
    अध्यक्ष – श्रीमती विदुला पवार

    वरील समारंभास प्रथम क्रमांकाच्या विजेता संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही उपस्थित होता, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. (8 गुण)

    [आकृती : मध्यभागी «भ्रमणध्वनी (मोबाईल)»; वर «निर्मिती», डावीकडे «खंत», उजवीकडे «महत्त्व व उपयोग», खाली «आनंदाचे क्षण».]

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : (8 गुण)

    ‘झाडे लावा–झाडे जगवा’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →