Skip to content
doubtly

1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांन…

1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं ते सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.

कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय ? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.

(1) कृती करा : (2)
[आकृती : «अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे» या चौकटीतून दोन बाण बाहेर पडले आहेत; दोन्ही ठिकाणच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत.]

(2) आकृती पूर्ण करा : (2)
[आकृती : वरच्या चौकटीत «इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी» असे लिहिले आहे. खाली तीन बाण आहेत; पहिली व तिसरी जागा रिकामी आहे, मधल्या जागी «सहकार्य» असे भरलेले आहे.]

1 answer

Best answer

(1) अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे : (i) ताठ मानेनं वावरता येतं. (ii) स्वाभिमान व आत्मविश्वास वाढतो. (परिणामी अधिक यश मिळू लागतं.)

(2) इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी : (i) इतरांचा आदर व विश्वास — (ii) सहकार्य (दिलेले) — (iii) लोक तुमचं ऐकू लागतात.

Doubtly AI · 25 Oct 2026 AI-verified · Oct 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.