(i) सटकी मारणे – चकवून पळून जाणे, पत्ता न लागू देता निघून जाणे.
वाक्य : पोलिसांना पाहताच चोरटा सटकी मारून निघून गेला.
(ii) कान देऊन ऐकणे – लक्षपूर्वक, मन लावून ऐकणे.
वाक्य : शिक्षकांचा उपदेश सर्व विद्यार्थ्यांनी कान देऊन ऐकला.
(iii) पित्त खवळणे – अतिशय राग येणे.
वाक्य : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना पाहून सफाई कर्मचाऱ्यांचे पित्त खवळले.
(iv) अचंबित होणे – आश्चर्यचकित होणे.
वाक्य : लहानग्या मुलीचे अचूक उत्तर ऐकून पाहुणे अचंबित झाले.