5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपे…
5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)
विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं ते सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.
कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय ? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.