(नमुना उत्तर) आमच्या घरासमोरच्या झाडावर एका चिमणीने घरटे बांधले होते. काही दिवसांनी त्यात पिल्ले दिसू लागली. चिमणी दिवसभर दाणे, किडे आणून पिल्लांच्या चोचीत भरवत असे. एकदा एक मांजर झाडाजवळ आली, तेव्हा चिमणी जोरजोरात चिवचिवाट करत तिच्याभोवती फिरू लागली आणि मांजरीला तिथून हाकलेपर्यंत शांत बसली नाही.
तसेच आमच्या गल्लीतील कुत्रीही आपल्या पिल्लांजवळ कोणी गेले तर गुरगुरत असे. यावरून मला जाणवले, की पक्षी-प्राणीसुद्धा आपल्या पिल्लांवर माणसांइतकेच प्रेम करतात आणि त्यांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही तयार असतात.