(नमुना उत्तर) माझ्याकडे एक जुने घड्याळ आहे. ते माझ्या आजोबांनी मला दहावीत गेल्यावर भेट दिले होते. त्यांनी ते त्यांच्या पहिल्या पगारातून घेतले होते. घड्याळ देताना ते म्हणाले होते, ‘‘वेळेची किंमत ओळख, म्हणजे आयुष्य तुझी किंमत ओळखेल.’’
आज आजोबा आमच्यात नाहीत; पण ते घड्याळ हातात बांधले, की ते माझ्याजवळ असल्यासारखे वाटते. परीक्षेच्या वेळी ते घड्याळ मला आत्मविश्वास देते. बाजारात त्याची किंमत फार नसेल, पण माझ्यासाठी ते अनमोल आहे, कारण त्याच्याशी आजोबांच्या प्रेमाच्या आठवणी जोडलेल्या आहेत.