मला पाठाचा शेवटचा प्रसंग सर्वांत आवडला. महिनाभर उपास, आहारनियंत्रण, दोरीवरच्या उड्या, धावणे अशी ‘उग्र साधना’ केल्यावर वीस-पंचवीस पौंड वजन घटले असेल, अशा खात्रीने पंत वजनयंत्रावर उभे राहतात; पण तिकिटावर वजन एकशे एक्याऐंशीवरून एकशे ब्याण्णव पौंड झालेले दिसते आणि सोबत भविष्य येते, ‘आप बहुत समझदार और गंभीर है!’
हा विनोद आवडण्याचे कारण म्हणजे अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिणाम यांतील मोठी विसंगती. पंतांचे मधले अपवाद (पार्टीतील भजी, साखरभात, कोळंबीभात) आठवले की हे का घडले ते लगेच कळते. शिवाय भविष्यातील ‘समझदार’ हा शब्द पंतांच्या स्थितीवर उपहास करतो. ‘वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो’ ही शेवटची कोटीही खूप मार्मिक आहे.