(नमुना उत्तर) समजा, मी रोज पहाटे पाच वाजता उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला आणि तो चार-पाच दिवसांतच मोडला, तर आई म्हणेल, ‘‘मला माहीतच होतं, हे चार दिवसांचं नाटक आहे!’’ बाबा हसत म्हणतील, ‘‘संकल्प करणं सोपं असतं, टिकवणं कठीण.’’
आजी मला समजावेल, ‘‘हरकत नाही, पुन्हा सुरुवात कर; सवय हळूहळू लागते.’’ तर धाकटी बहीण चिडवत म्हणेल, ‘‘दादाचा गजर फक्त आम्हांलाच उठवतो!’’ या प्रतिक्रियांतून चिडवणे, काळजी आणि प्रोत्साहन असे सगळे भाव दिसतील आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.