लेखकाला मेटलायझिंगच्या कामासाठी मदत हवी होती; पण ‘तुला स्वतःलाच सर्व करावे लागेल’ असे सांगण्यात आले. लेखकाने धडपड करून ते काम स्वतः पूर्ण केले. त्यानंतर वरिष्ठांनी त्यांना हवे तेवढे लोक देण्याची तयारी दाखवली आणि सांगितले, की आता ते लोक तुझे ऐकतील, कारण तू हे करू शकतोस हे त्यांनी पाहिले आहे.
यावरून स्पष्ट होते, की आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही. आधी स्वतः काम करून दाखवले, तर आपल्या शब्दाला वजन येते आणि इतर लोक विश्वासाने आपले ऐकतात. म्हणूनच ‘आधी केले मग सांगितले’ ही उक्ती यथार्थ आहे.