(नमुना उत्तर) विज्ञानाच्या पुस्तकात मी अनेकदा वाचले होते, की बिया रुजण्यासाठी पाणी, हवा आणि योग्य तापमान लागते; पण ते माझ्या फारसे लक्षात राहत नव्हते. एकदा शाळेत आम्ही ओल्या कापसावर, कोरड्या कापसावर आणि पाण्यात पूर्ण बुडवलेल्या अशा तीन प्रकारे मूग ठेवले. काही दिवसांनी फक्त ओल्या कापसावरच मूग रुजले.
हा प्रयोग स्वतः केल्यामुळे ती संकल्पना मला कायमची समजली आणि लक्षात राहिली. पाठांतर करून मिळालेले ज्ञान लवकर विसरले जाते, पण प्रत्यक्ष करून मिळालेला अनुभव आत्मविश्वास देतो. लेखकालाही मेटलायझिंगचे काम स्वतः केल्यामुळेच मोठा धडा मिळाला. म्हणून प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे अधिक परिणामकारक असते.