आयुष्यात दु:ख, संकटे, अपयश येतच असतात. कवीच्या आयुष्यातही दारिद्र्य आणि कष्ट होते; पण त्याने जगाच्या शाळेत दु:ख कसे पचवायचे आणि त्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने कसे जगायचे, हे शिकून घेतले.
या वाक्यातून असा विचार जाणवतो, की दु:खासमोर हार मानून खचून जाणे योग्य नाही. दु:ख धैर्याने सहन केले, त्यातून धडा घेतला आणि पुन्हा उभे राहिलो, तरच जीवन अर्थपूर्ण होते. जसे पोलाद झोतभट्टीत तापून अधिक मजबूत होते, तसे दु:खातून माणूस अधिक कणखर होतो. हा सकारात्मक, प्रयत्नवादी विचार मला महत्त्वाचा वाटतो.