या कवितेत कवीने जीवनाचे कटू पण खरे सत्य मांडले आहे. माणसाचे आयुष्य थोडेच असते आणि त्यातील बराचसा काळ चांगल्या दिवसांची वाट पाहण्यात आणि दु:ख सोसण्यात जातो. गरिबांसाठी तर पोटाची भूक भागवणे हाच मोठा संघर्ष असतो; ‘भाकरीचा चंद्र’ शोधण्यातच आयुष्य संपून जाते.
मात्र कवी केवळ निराशा व्यक्त करत नाही. दु:खाच्या शाळेत माणूस दु:ख पेलायला आणि पुन्हा जगायला शिकतो; अश्रूच कधी कधी मित्र बनून साथ देतात. संकटांच्या झोतभट्टीत तापूनच आयुष्य पोलादासारखे कणखर होते. म्हणजे दु:ख हे जीवनाचे वास्तव असले, तरी त्याला धैर्याने सामोरे जाणे हेच खरे जगणे आहे, असे जीवनसत्य मला या कवितेतून जाणवते.