(नमुना उत्तर) आमच्या इमारतीत एक वृद्ध आजी एकट्याच राहतात. एकदा त्या आजारी पडल्या, तेव्हा त्यांना औषधे आणणे, दवाखान्यात नेणे कोणालाच शक्य होत नव्हते. मी शाळेतून आल्यावर रोज त्यांच्यासाठी औषधे, दूध, भाजी आणून देऊ लागलो आणि संध्याकाळी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो.
आठवडाभरात आजी बऱ्या झाल्या. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतले समाधान पाहून मला जो आनंद झाला, तो कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठा होता. तेव्हा मला अब्दुलसारखी ‘दुसऱ्यासाठी जगण्यातली’ गोडी समजली.