रेखामावशींनी फरशीवरचे आपल्या पायांचे मळलेले ठसे ओल्या फडक्याने सहज पुसले. पण आपल्या जीवनशैलीमुळे वातावरणावर उमटणारे ठसे, म्हणजे वाहनांतून, इंधन जाळण्यातून आपण हवेत सोडत असलेला कार्बन डायऑक्साइड (कार्बन फूटप्रिन्ट), हे डोळ्यांना दिसत नाहीत आणि इतक्या सहजपणे पुसता येत नाहीत.
हे प्रदूषण साचत जाते आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरते. ते कमी करण्यासाठी झाडे लावणे, सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे अशी जीवनशैली दीर्घकाळ स्वीकारावी लागते. म्हणून आपण प्रत्येक कृती करताना तिचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे, असा या विधानाचा अर्थ आहे.