प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढील गुण आवश्यक असतात :
- जिद्द व ध्येयनिष्ठा : ध्येय निश्चित करून त्याची मनाशी खूणगाठ बांधणे.
- कष्टाळूपणा व सातत्य : रोज नियमित सराव, परिश्रम करण्याची तयारी.
- सकारात्मक दृष्टिकोन : साधनांच्या अभावातही उपलब्ध गोष्टींचा उपयोग करणे; उदा., लेखकाने जळणाच्या लाकडांतून बॅट तयार केली.
- संधीचा उपयोग : मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेणे.
- शिस्त व संयम : अपयश, टीका सहन करून पुन्हा प्रयत्न करणे.
- आत्मविश्वास : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे.