Chapter: Space Missions· Science & Technology Part 1
उत्तर:
(a) दिवाळीचा रॉकेट हा उपग्रह प्रक्षेपकाचा (उपग्रह प्रक्षेपण यानाचा) लहान नमुना आहे. भारताचे (इस्रोचे) प्रक्षेपक: PSLV (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान) व GSLV (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान).
(b) त्याचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार (संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार) चालते: इंधन जळून तयार झालेले उष्ण वायू मोठ्या बलाने मागच्या दिशेने बाहेर पडतात (क्रिया) आणि ते वायू रॉकेटला तेवढ्याच पण विरुद्ध दिशेच्या बलाने पुढे ढकलतात (प्रतिक्रिया).