Skip to content
doubtly

Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2025)

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2025, March 120 minutes 40 marks Save WhatsApp

Sections

प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण) 5 Q
प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण) 5 Q
प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) (4 गुण) 3 Q
प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण) 5 Q
प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण) 8 Q
प्रश्न 4 कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा (5 गुण) 2 Q

महाराष्ट्र राज्य मंडळाची अधिकृत प्रश्नपत्रिका N 841, मार्च 2025, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, मराठी माध्यम. प्रश्न मंडळाने छापल्याप्रमाणे (स्रोत: mahahsscboard.in); उत्तरे Doubtly ने लिहिली आहेत. हीच प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात येथे आहे: इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका (N 840).

Chapters covered

Instructions

सूचना :

(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(iv) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
(v) आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.

प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण)

  1. प्रश्न 1 (अ)(i) अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ...................... मध्ये आहे.

    1. (अ) गण 2
    2. (ब) गण 16
    3. (क) आवर्त 2
    4. (ड) डी-खंड
  2. प्रश्न 1 (अ)(ii) ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना ...................... असे म्हणतात.

    1. (अ) संयोग अभिक्रिया
    2. (ब) अपघटन अभिक्रिया
    3. (क) विस्थापन अभिक्रिया
    4. (ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
  3. प्रश्न 1 (अ)(iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी ...................... धातूचा उपयोग करतात.

    1. (अ) नायक्रोम
    2. (ब) तांबे
    3. (क) टंगस्टन
    4. (ड) ॲल्युमिनिअम
  4. प्रश्न 1 (अ)(iv) एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे ...................... म्हणतात.

    1. (अ) परावर्तन
    2. (ब) अपस्करण
    3. (क) विकिरण
    4. (ड) अपवर्तन
  5. प्रश्न 1 (अ)(v) \(\mathrm{CaO + H_2O \longrightarrow Ca(OH)_2}\) + उष्णता ही ...................... प्रकारची अभिक्रिया आहे.

    1. (अ) उष्मादायी
    2. (ब) विद्युतअपघटनी
    3. (क) अपघटन
    4. (ड) उष्माग्राही

प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण)

  1. प्रश्न 1 (ब)(i) चूक की बरोबर ते लिहा :
    पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते.

  2. प्रश्न 1 (ब)(ii) वेगळा घटक ओळखा :
    ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक

  3. प्रश्न 1 (ब)(iii) ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?

  4. प्रश्न 1 (ब)(iv) योग्य जोडी जुळवा :

    ‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ
    साधा सूक्ष्मदर्शक(a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे
    (b) दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे
    (c) घड्याळ दुरुस्ती करणे
  5. प्रश्न 1 (ब)(v) 0 ºC ते 4 ºC या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात ?

प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) (4 गुण)

  1. प्रश्न 2 (अ)(i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुआकार कमी होत जातो.

    2 marks See answer →
  2. प्रश्न 2 (अ)(ii) विद्युतपारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

    2 marks See answer →
  3. प्रश्न 2 (अ)(iii) काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये ईथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात.

    2 marks See answer →

प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण)

  1. प्रश्न 2 (ब)(i) पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ? ते तत्त्व लिहा.

    2 marks See answer →
  2. प्रश्न 2 (ब)(ii) लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल ?

    2 marks See answer →
  3. प्रश्न 2 (ब)(iii) फरक स्पष्ट करा :
    वस्तुमान आणि वजन

    2 marks See answer →
  4. प्रश्न 2 (ब)(iv) ‘दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो’ यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
    (a) प्रक्षेपकाचे नाव सांगा.
    (b) त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते ?

    2 marks See answer →
  5. प्रश्न 2 (ब)(v) अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा.

    2 marks See answer →

प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण)

  1. प्रश्न 3 (i) एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. ‘g’ चे मूल्य 10 m/s2 आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा :
    (a) जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी.
    (b) जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग.

    3 marks See answer →
  2. प्रश्न 3 (ii) वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा :
    (a) सर्वाधिक विद्युतऋण अणु
    (b) सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणु
    (c) सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू

    3 marks See answer →
  3. प्रश्न 3 (iii) (a) तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. मुक्त होणारा वायू कोणता ? त्याचा रंग सांगा.
    (b) अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
    (c) अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा.

    3 marks See answer →
  4. प्रश्न 3 (iv) आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा :

    (आकृती: हाताच्या दोन आकृत्या ‘अ’ व ‘आ’. प्रत्येकीत अंगठा, तर्जनी व मधले बोट परस्परांना लंब ताणलेले असून प्रत्येक बोटावर दिशा दाखवणारा बाण आहे; उरलेली दोन बोटे मुडपलेली आहेत. ‘अ’ मध्ये हाताचा तळवा समोर असून अंगठा वर, तर्जनी डावीकडे व मधले बोट खाली आहे. ‘आ’ ही ‘अ’ ची आरशातील प्रतिमा आहे: अंगठा वर, तर्जनी उजवीकडे व मधले बोट खाली.)

    3 marks See answer →
  5. प्रश्न 3 (v) इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
    (a) इंद्रधनुष्यनिर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
    (b) यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा.
    (c) पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात ?

    3 marks See answer →
  6. प्रश्न 3 (vi) नावे लिहा :
    (a) सुरीने सहज कापता येतील असे दोन धातू.
    (b) काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव.
    (c) विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ.

    3 marks See answer →
  7. प्रश्न 3 (vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :

    (आकृती: द्रावण असलेले बीकर. डावीकडे चांदीची पट्टी ‘चांदीचा धनाग्र’ आणि उजवीकडे ‘ऋणाग्र चमचा’ द्रावणात बुडवलेले असून दोन्ही वरच्या ‘विजेरी’ला तारेने जोडलेले आहेत. तारेत e– ची दिशा धनाग्राकडून विजेरीकडे आणि विजेरीकडून चमच्याकडे दाखवली आहे. द्रावणात Ag+ आयन धनाग्राकडून द्रावणात व चमच्याकडे जाताना आणि NO3– आयन धनाग्राकडे जाताना दाखवले आहेत.)

    (a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो ?
    (b) ही प्रक्रिया कशी घडते ?
    (c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.

    3 marks See answer →
  8. प्रश्न 3 (viii) खालील सारणी पूर्ण करा :

    उपग्रहाचा प्रकारउपग्रहाचे कार्यभारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे
    (a).........................पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे..........................
    (b)हवामान उपग्रह..................................................
    (c)..................................................IRS
    प्रक्षेपक : PSLV
    3 marks See answer →

प्रश्न 4 कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा (5 गुण)

  1. प्रश्न 4 (i) (a) मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
    (b) निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे ?
    (c) नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात ?
    (d) कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते ?

    5 marks See answer →
  2. प्रश्न 4 (ii) क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
    (a) क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
    (b) क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा.
    (c) क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा.
    (d) क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो ?
    (e) क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळविरहित) रेखाटन करा.

    5 marks See answer →