प्रश्न 4 (i) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :(आकृती: पाणी व पाइनचे तेल भरलेली एक टाकी; टाकीच्या तळाशी ढवळणी असून तिचा दांडा वरच्या फिरणाऱ्या चाकाला जोडलेला आहे; बाजूने हवेचा पुरवठा दिला आहे. मिश्रणात बुडबुडे तयार होत आहेत; वर तयार…
प्रश्न 4 (i) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: पाणी व पाइनचे तेल भरलेली एक टाकी; टाकीच्या तळाशी ढवळणी असून तिचा दांडा वरच्या फिरणाऱ्या चाकाला जोडलेला आहे; बाजूने हवेचा पुरवठा दिला आहे. मिश्रणात बुडबुडे तयार होत आहेत; वर तयार झालेला फेन बाजूच्या पात्रात वाहून जात असून तेथे “संहत सल्फाइड धातुक” असे लिहिले आहे; टाकीच्या खालच्या बाजूने “मृदा अशुद्धी” बाहेर पडताना दाखवली आहे.)
(अ) वरील आकृतीतील पद्धतीचे नाव लिहा.
(ब) वरील पद्धत कशासाठी वापरतात ?
(क) वरील पद्धतीत कोणत्या दोन गुणधर्माचा उपयोग केला जातो ?
(ड) ढवळणीचा काय उपयोग आहे ?
(इ) संहतीकरण केलेल्या कोणत्याही एका धातुकाचे नाव लिहा.