महाराष्ट्र राज्य मंडळाची अधिकृत प्रश्नपत्रिका N 406, जून 2026 (पुरवणी परीक्षा), विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, मराठी माध्यम. प्रश्न मंडळाने छापल्याप्रमाणे (स्रोत: mahahsscboard.in); उत्तरे Doubtly ने लिहिली आहेत. हीच प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात येथे आहे: इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका (N 405).
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जून 2026)
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| प्रश्न 1 (अ) योग्य पर्याय निवडा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण) | 3 Q | |
| प्रश्न 2 (ब) खालील कोणतेही तीन प्रश्न सोडवा (6 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा (15 गुण) | 8 Q | |
| प्रश्न 4 खालीलपैकी कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा (5 गुण) | 2 Q |
Chapters covered
Instructions
सूचना :
(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(iv) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
(v) आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
(vi) प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी.
प्रश्न 1 (अ) योग्य पर्याय निवडा (5 गुण)
-
प्रश्न 1 (अ)(i) ................ हा कार्बोक्झिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.
- (अ) —OH
- (ब) —CHO
- (क) —\(\mathrm{NH_2}\)
- (ड) —COOH
-
प्रश्न 1 (अ)(ii) वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास ..................... असे म्हणतात.
- (अ) घर्षण बल
- (ब) गुरुत्व बल
- (क) अभिकेंद्री बल
- (ड) अपकेंद्री बल
-
प्रश्न 1 (अ)(iii) आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास तर पाण्याचे ........................ होते.
- (अ) ऑक्सिडीकरण
- (ब) क्षपण
- (क) विद्युत अपघटन
- (ड) आयनीभवन
-
प्रश्न 1 (अ)(iv) भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची (AC) वारंवारता ........................ आहे.
- (अ) 100 हर्टझ्
- (ब) 50 हर्टझ्
- (क) 15 हर्टझ्
- (ड) 500 हर्टझ्
-
प्रश्न 1 (अ)(v) काचेच्या लादीचा पृष्ठभाग आणि आपाती किरण यांच्यामधील कोनाचे माप 30º आहे. तर आपाती कोनाचे माप ...................... असेल.
- (अ) 30º
- (ब) 60º
- (क) 90º
- (ड) यापैकी नाही
प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण)
-
प्रश्न 1 (ब)(i) वेगळा घटक ओळखा :
व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, तापमापी. -
प्रश्न 1 (ब)(ii) खालील तक्ता पूर्ण करा :
मूलद्रव्य इलेक्ट्रॉन संरूपण गण क्रमांक Na (2, 8, 1) गण–1 Al (2, 8, 3) ............. -
प्रश्न 1 (ब)(iii) चूक की बरोबर ते लिहा :
वस्तूचे वजन सर्वत्र समान असते. -
प्रश्न 1 (ब)(iv) सहसंबंध पूर्ण करा :
अन्न शिजणे : रासायनिक बदल :: पाण्याचे बाष्पीभवन : ................. -
प्रश्न 1 (ब)(v) खाली दिलेल्या रचनासूत्रावरून हायड्रोकार्बन ओळखा :
(आकृती: रचनासूत्र H–C–C–H; दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले असून प्रत्येक कार्बनच्या वर एक H व खाली एक H आहे.)
प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण)
-
प्रश्न 2 (अ)(i) तारे आहे त्या स्थितीपेक्षा थोड्या उंचीवर असल्याचे भासतात.
-
प्रश्न 2 (अ)(ii) एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
-
प्रश्न 2 (अ)(iii) ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाहीत.
प्रश्न 2 (ब) खालील कोणतेही तीन प्रश्न सोडवा (6 गुण)
-
प्रश्न 2 (ब)(i) खालील आकृतीस नावे देवून या उपकरणाच्या साहाय्याने कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येतो ?
(आकृती: पाण्याने भरलेले एक उंच दंडगोलाकार भांडे; त्याच्या मधल्या भागाभोवती एक पसरट पात्र असून त्यात भरलेल्या पदार्थाकडे “A ..........” असा निर्देश आहे; पात्राच्या नळीतून पाणी खालच्या बीकरमध्ये गळत आहे. भांड्याच्या वरच्या भागात तापमापी \(T_2\) असून ते 0 °C दाखवते; खालच्या भागात तापमापी \(T_1\) असून त्याचे वाचन “B ........°C” असे दाखवले आहे.)
-
प्रश्न 2 (ब)(ii) एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 40 cm आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ?
-
प्रश्न 2 (ब)(iii) (अ) ॲसेटिक ॲसिडचे रासायनिक सूत्र लिहा.
(ब) व्हिनेगरचा कोणताही एक उपयोग लिहा. -
प्रश्न 2 (ब)(iv) नियम लिहा.
(अ) उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (ब) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. -
प्रश्न 2 (ब)(v) व्याख्या लिहा :
(अ) धातूके (ब) मृदा अशुद्धी
प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा (15 गुण)
-
प्रश्न 3 (i) केप्लरचे तीन नियम लिहा :
-
प्रश्न 3 (ii) विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविलेला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युत–विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल, तर :
(अ) दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे ?
(ब) हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल ? -
प्रश्न 3 (iii) रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक लिहून कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण लिहा.
-
प्रश्न 3 (iv) (अ) पुनर्हिमायन म्हणजे काय ?
(ब) दाबामुळे बर्फाच्या द्रवाणांकावर काय परिणाम होतो ?
(क) पुनर्हिमायनाचे एक उदाहरण लिहा. -
प्रश्न 3 (v) खालील तक्ता पूर्ण करा :
अ.क्र. बहुवारिक एकवारिकाचे नाव आढळ 1 पॉलिसॅकराइड ग्लूकोज स्टार्च 2 सेल्युलोज ........ लाकूड (वनस्पती पेशीभित्तिका) 3 प्रथिने अल्फा अमिनो ॲसिड ........ 4 ......... न्यूक्लिओटाइड (डिऑक्सीरायबोज फॉस्फेट) ......... 5 आर.एन.ए. ........... पेशीतील केंद्रक व पेशीद्रव 6 रबर आयसोप्रिन
\(\mathrm{CH_2{=}C(CH_3){-}CH{=}CH_2}\)........... -
प्रश्न 3 (vi) खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा :
अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016 च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरूपयोगी वस्तूंचे 1 सेमी हून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय.
हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाला आहे. लवकरच यामुळे नवीन अवकाशयानांचे प्रक्षेपण कठीण होऊन बसेल. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत.
(अ) अवकाश कचरा म्हणजे काय ?
(ब) अवकाशातील कचरा कृत्रिम उपग्रहासाठी कसा धोकादायक ठरू शकतो ?
(क) या कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जात आहेत ? -
प्रश्न 3 (vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विविध माध्यमातील प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा :
(आकृती: तीन आकृत्या. (अ) विरल माध्यमातून घन माध्यमात तिरपा जाणारा किरण; आपाती कोन i व अपवर्तन कोन r दाखवले असून किरण स्तंभिकेकडे झुकतो. (ब) घन माध्यमातून विरल माध्यमात तिरपा जाणारा किरण; i व r दाखवले असून किरण स्तंभिकेपासून दूर जातो. (क) विरल माध्यमातून घन माध्यमात पृष्ठभागाला लंब दिशेने जाणारा किरण, जो दिशा न बदलता सरळ जातो.)
-
प्रश्न 3 (viii) मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचे दोष लिहा.
प्रश्न 4 खालीलपैकी कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा (5 गुण)
-
प्रश्न 4 (i) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: पाणी व पाइनचे तेल भरलेली एक टाकी; टाकीच्या तळाशी ढवळणी असून तिचा दांडा वरच्या फिरणाऱ्या चाकाला जोडलेला आहे; बाजूने हवेचा पुरवठा दिला आहे. मिश्रणात बुडबुडे तयार होत आहेत; वर तयार झालेला फेन बाजूच्या पात्रात वाहून जात असून तेथे “संहत सल्फाइड धातुक” असे लिहिले आहे; टाकीच्या खालच्या बाजूने “मृदा अशुद्धी” बाहेर पडताना दाखवली आहे.)
(अ) वरील आकृतीतील पद्धतीचे नाव लिहा.
(ब) वरील पद्धत कशासाठी वापरतात ?
(क) वरील पद्धतीत कोणत्या दोन गुणधर्माचा उपयोग केला जातो ?
(ड) ढवळणीचा काय उपयोग आहे ?
(इ) संहतीकरण केलेल्या कोणत्याही एका धातुकाचे नाव लिहा. -
प्रश्न 4 (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: डोळ्याचा छेद; डोळ्यासमोरील जवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण नेत्रभिंगातून जाऊन दृष्टिपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येताना दाखवले आहेत.)
(अ) वरील आकृतीत दर्शवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा. (1)
(ब) या दृष्टिदोषाची कारणे लिहा. (1)
(क) या दोषाचे निराकरण कसे केले जाते ? (1)
(ड) या दृष्टिदोषाचे निराकरण करणारी आकृती काढा. (2)