Skip to content
doubtly
Chapter: Periodic Classification of Elements· Science & Technology Part 1

प्रश्न 3 (i) कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा :(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण .................... खंडात विभाजन केले आ…

प्रश्न 3 (i) कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा :

(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण .................... खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... खंडामध्ये आहे. आणि ही सर्व मूलद्रव्ये .................... आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे .................... खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.

1 answer

Best answer

उत्तर: चार; एस-खंड; पी-खंड; डी-खंड; धातू; एफ-खंड.

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण चार खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश एस-खंड मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत (हायड्रोजन वगळून). गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश पी-खंड मध्ये आहे. या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश डी-खंड खंडामध्ये आहे आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे एफ-खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.

Doubtly AI · 4 Nov 2026 AI-verified · Nov 2026 Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.