महाराष्ट्र राज्य मंडळाची अधिकृत प्रश्नपत्रिका N 641, मार्च 2024 (18 मार्च 2024), विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, मराठी माध्यम. प्रश्न मंडळाने छापल्याप्रमाणे (स्रोत: mahahsscboard.in); उत्तरे Doubtly ने लिहिली आहेत. हीच प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात येथे आहे: इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका (N 640).
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2024)
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण) | 3 Q | |
| प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण) | 8 Q | |
| प्रश्न 4 खालील प्रश्न सोडवा (कोणताही एक) (5 गुण) | 2 Q |
Chapters covered
Instructions
सूचना :
(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(iv) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
(v) आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण)
-
प्रश्न 1 (अ)(i) उष्णतेचे SI पद्धतीतील एकक .................... हे आहे.
- (अ) कॅलरी
- (ब) ज्यूल
- (क) Kcal/kg °C
- (ड) Cal/g °C
-
प्रश्न 1 (अ)(ii) सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण :
- (अ) प्रकाशाचे परावर्तन
- (ब) प्रकाशाचे अपवर्तन
- (क) प्रकाशाचे अपस्करण
- (ड) प्रकाशाचे अवशोषण
-
प्रश्न 1 (अ)(iii) .................... हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.
- (अ) —COOH
- (ब) —CO—
- (क) —CHO—
- (ड) —OH
-
प्रश्न 1 (अ)(iv) साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये .................... भिंगाचा वापर करतात.
- (अ) अंतर्वक्र
- (ब) समतल अंतर्वक्र
- (क) समतल बहिर्वक्र
- (ड) बहिर्वक्र
-
प्रश्न 1 (अ)(v) .................... पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो.
- (अ) धनाग्रीकरण
- (ब) कथिलीकरण
- (क) जस्त विलेपन
- (ड) संमिश्रीकरण
प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण)
-
प्रश्न 1 (ब)(i) सर्वात लहान आकाराच्या अणुचे नाव लिहा.
-
प्रश्न 1 (ब)(ii) कॅल्शिअम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा.
-
प्रश्न 1 (ब)(iii) कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
-
प्रश्न 1 (ब)(iv) दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा :
(आकृती: H : C : C : H अशी ओळ; दोन्ही कार्बन अणूंच्या वर एकेक H व खाली एकेक H असून प्रत्येक H व C यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची एक जोडी (दोन ठिपके) दाखवली आहे.)
-
प्रश्न 1 (ब)(v) योग्य जोडी जुळवा :
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ पाण्याचा अपवर्तनांक (a) 1.31
(b) 1.36
(c) 1.33
प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण)
-
प्रश्न 2 (अ)(i) शास्त्रीय कारणे लिहा : चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.
-
प्रश्न 2 (अ)(ii) शास्त्रीय कारणे लिहा : विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
-
प्रश्न 2 (अ)(iii) शास्त्रीय कारणे लिहा : चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात.
प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण)
-
प्रश्न 2 (ब)(i) डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा.
-
प्रश्न 2 (ब)(ii) दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा :
(आकृती: दोन चुंबकीय ध्रुवांच्या (दोन ठोकळ्यांच्या) मध्ये एक आयताकृती कुंडल ठेवले आहे. कुंडलाची टोके खाली एका दंडगोलाकार आसाशी (अक्षाशी) जोडलेली असून तेथून बाह्य परिपथात गेली आहेत; या परिपथात ॲमीटर A जोडलेला आहे.)
-
प्रश्न 2 (ब)(iii) उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय ? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.
-
प्रश्न 2 (ब)(iv) मुक्त पतन म्हणजे काय ? ते केंव्हा शक्य होते ?
-
प्रश्न 2 (ब)(v) एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 cm आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ?
प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण)
-
प्रश्न 3 (i) कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा :
(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)
इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण .................... खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश .................... खंडामध्ये आहे. आणि ही सर्व मूलद्रव्ये .................... आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे .................... खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.
-
प्रश्न 3 (ii) (a) रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ?
(b) त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या. -
प्रश्न 3 (iii) खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आलेख: उभ्या अक्षावर तापमान °C (0 ते 100) आणि आडव्या अक्षावर काल (मिनिटे, 0 ते 34). A (0, 0) पासून B (सुमारे 4 मिनिटे) पर्यंत रेषा 0 °C वर आडवी असून तेथे ‘बर्फ + पाणी (स्थायु + द्रव)’ असे लिहिले आहे. B पासून C (100 °C, सुमारे 22 मिनिटे) पर्यंत रेषा सरळ वर जाते, तिच्यावर ‘पाणी द्रव’ असे लिहिले आहे. C पासून D पर्यंत रेषा 100 °C वर आडवी असून तेथे ‘उकळते पाणी + वाफ’ व ‘द्रव – वायु अवस्था’ असे लिहिले आहे.)
(a) दिलेला आलेख काय दर्शवतो ?
(b) रेषा AB काय दर्शवते ?
(c) रेषा BC काय दर्शवते ? -
प्रश्न 3 (iv) खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा :
(आकृती 1: दूरच्या वस्तूकडून येणारे समांतर किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या (दृष्टिपटलाच्या) पुढे एका बिंदूत एकत्र येतात. आकृती 2: डोळ्याजवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येतात.)
मुद्दे ↓ / आकृती → आकृती 1 आकृती 2 (a) दोषाचे नाव .................... .................... (b) प्रतिमेचे स्थान .................... .................... (c) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग .................... .................... -
प्रश्न 3 (v) आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.
-
प्रश्न 3 (vi) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: m1 व m2 वस्तुमानांचे दोन गोल; त्यांच्या केंद्रांमधील अंतर d. प्रत्येक गोलावर दुसऱ्या गोलाच्या दिशेने बल F दाखवले आहे.)
(a) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा.
(b) दोन वस्तूमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल ?
(c) जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल ? -
प्रश्न 3 (vii) समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.08 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल ?
-
प्रश्न 3 (viii) नालकुंतल म्हणजे काय ? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या.
प्रश्न 4 खालील प्रश्न सोडवा (कोणताही एक) (5 गुण)
-
प्रश्न 4 (i) खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: काचेचा त्रिकोणी लोलक; ‘सूर्यप्रकाश’ लोलकाच्या एका पृष्ठावर पडतो, लोलकात अपवर्तित होतो आणि दुसऱ्या पृष्ठातून रंगांच्या पट्ट्याच्या रूपात बाहेर पडतो. पट्ट्यातील रंग वरून खाली R, O, Y, G, B, I, V असे दाखवले आहेत.)
(a) आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे ?
(b) सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता ?
(c) सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता ?
(d) वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
(e) व्याख्या लिहा : वर्णपंक्ती. -
प्रश्न 4 (ii) दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: स्टँडला लावलेली मोठी परीक्षानळी; तिच्या तोंडाला बूच आहे. बुचातून एक थिसल नरसाळे परीक्षानळीच्या तळाशी गेले आहे; परीक्षानळीत ॲसेटिक ॲसिड असून तळाशी सोडिअम कार्बोनेट आहे आणि तेथे बुडबुडे दिसत आहेत. बुचातून निघालेली वायुवाहक नलिका हातात धरलेल्या लहान परीक्षानळीतील ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवली आहे.)
(a) वरील अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहा.
(b) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता ?
(c) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो ?
(d) वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादिते मिळतील ?
(e) ॲसेटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा.