प्रश्न 4 (ii) दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :(आकृती: स्टँडला लावलेली मोठी परीक्षानळी; तिच्या तोंडाला बूच आहे. बुचातून एक थिसल नरसाळे परीक्षानळीच्या तळाशी गेले आहे; परीक्षानळीत ॲसेटिक ॲसिड असून तळाशी सोडिअम कार्बोनेट आहे…
प्रश्न 4 (ii) दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: स्टँडला लावलेली मोठी परीक्षानळी; तिच्या तोंडाला बूच आहे. बुचातून एक थिसल नरसाळे परीक्षानळीच्या तळाशी गेले आहे; परीक्षानळीत ॲसेटिक ॲसिड असून तळाशी सोडिअम कार्बोनेट आहे आणि तेथे बुडबुडे दिसत आहेत. बुचातून निघालेली वायुवाहक नलिका हातात धरलेल्या लहान परीक्षानळीतील ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवली आहे.)
(a) वरील अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहा.
(b) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता ?
(c) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो ?
(d) वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादिते मिळतील ?
(e) ॲसेटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा.