प्रश्न 4 (ii) खालील उताऱ्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्…
प्रश्न 4 (ii) खालील उताऱ्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन (CH4). आपण मीथेनची संरचना आधीच पाहिली आहे. ईथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र C2H6 आहे.
ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. एथीन व ईथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन–कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘अल्कीन’ म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन–कार्बन तिहेरी बंध असतो, अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना ‘अल्काईन’ असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.
(अ) हायड्रोकार्बन म्हणजे काय ? 1
(ब) सर्वात लहान हायड्रोकार्बनचे नाव लिहा. 1
(क) व्याख्या लिहा–असंपृक्त संयुगे. 1
(ड) अल्कीन व अल्काईन यामधील फरक स्पष्ट करा. 2