Skip to content
doubtly

Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2024)

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2024, July 120 minutes 40 marks Save WhatsApp

Sections

प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण) 5 Q
प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण) 5 Q
प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण) 3 Q
प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण) 5 Q
प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण) 8 Q
प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) (5 गुण) 2 Q

महाराष्ट्र राज्य मंडळाची अधिकृत प्रश्नपत्रिका N 406, जुलै 2024, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, मराठी माध्यम. प्रश्न मंडळाने छापल्याप्रमाणे (स्रोत: mahahsscboard.in); उत्तरे Doubtly ने लिहिली आहेत. हीच प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात येथे आहे: इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका (N 405).

Chapters covered

Instructions

सूचना :

(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(iv) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुणदान केले जाईल.
(v) बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर (अ), (ब), (क) किंवा (ड) लिहावे.
उदा. (i) (अ), (ii) (ब), (iii) (क)
(vi) आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.

प्रश्न 1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा (5 गुण)

  1. प्रश्न 1 (अ)(i) आधुनिक आवर्तसारणीत अधातू ...................... खंडात आहेत.

    1. (अ) s-खंड
    2. (ब) p-खंड
    3. (क) d-खंड
    4. (ड) f-खंड
  2. प्रश्न 1 (अ)(ii) \(\mathrm{CuSO_{4(aq)} + Zn_{(s)} \longrightarrow ZnSO_{4(aq)} + Cu_{(s)}}\).
    दिलेली अभिक्रिया ...................... प्रकारची आहे.

    1. (अ) विस्थापन
    2. (ब) दुहेरी विस्थापन
    3. (क) संयोग
    4. (ड) अपघटन
  3. प्रश्न 1 (अ)(iii) विद्युतशक्तीचे एकक ...................... हे आहे.

    1. (अ) ज्यूल
    2. (ब) व्होल्ट
    3. (क) वॅट
    4. (ड) कुलोम
  4. प्रश्न 1 (अ)(iv) सूर्य क्षितीजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण :

    1. (अ) प्रकाशाचे परावर्तन
    2. (ब) प्रकाशाचे अपवर्तन
    3. (क) प्रकाशाचे अपस्करण
    4. (ड) प्रकाशाचे अवशोषण
  5. प्रश्न 1 (अ)(v) L.P.G. मध्ये ...................... हा एक ज्वलनशील पदार्थ आहे.

    1. (अ) इथेन
    2. (ब) प्रोपेन
    3. (क) मिथेन
    4. (ड) इथिन

प्रश्न 1 (ब) खालील प्रश्न सोडवा (5 गुण)

  1. प्रश्न 1 (ब)(i) सहसंबंध ओळखा :
    पितळ : तांबे व जस्त : : ब्राँझ : ..................

  2. प्रश्न 1 (ब)(ii) चूक की बरोबर ते लिहा :
    बेंझीन हे ॲरोमॅटीक संयुग आहे.

  3. प्रश्न 1 (ब)(iii) वेगळा घटक ओळखा :
    निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टिपटल

  4. प्रश्न 1 (ब)(iv) आपाती कोन 0º असेल, तर अपवर्ती कोनाचे माप किती ?

  5. प्रश्न 1 (ब)(v) विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा.

प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण)

  1. प्रश्न 2 (अ)(i) सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.

    2 marks See answer →
  2. प्रश्न 2 (अ)(ii) घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी वापरतात.

    2 marks See answer →
  3. प्रश्न 2 (अ)(iii) अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

    2 marks See answer →

प्रश्न 2 (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण)

  1. प्रश्न 2 (ब)(i) पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास, प्रकाशाचा पाण्यातील वेग किती ?
    (प्रकाशाचा निर्वातातील वेग = 3 × 108 m/s)

    2 marks See answer →
  2. प्रश्न 2 (ब)(ii) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

    (आकृती: टेबलावरील दोन लाकडी ठोकळ्यांवर बर्फाची लादी ठेवलेली आहे. बर्फाच्या लादीवरून एक बारीक तार नेलेली असून त्या तारेला टेबलाखाली एकाखाली एक अशी दोन वजने टांगलेली आहेत; तार बर्फातून खाली सरकते. आकृतीत ‘बर्फ’ व ‘वजन’ अशी नावे दिली आहेत.)

    (अ) आकृतीत दाखविलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा.
    (ब) त्या प्रक्रियेची व्याख्या लिहा.

    2 marks See answer →
  3. प्रश्न 2 (ब)(iii) \(\mathrm{2H_2S + SO_2 \longrightarrow 3S\downarrow + 2H_2O}\)

    (आकृती: अभिक्रियेच्या वरच्या बाजूला ‘A’ हा बाण SO2 पासून 3S कडे जातो, तर खालच्या बाजूला ‘B’ हा बाण 2H2S पासून 2H2O कडे जातो.)

    (अ) वरील रासायनिक अभिक्रिया ओळखा.
    (ब) A आणि B अभिक्रियांची नावे लिहा.

    2 marks See answer →
  4. प्रश्न 2 (ब)(iv) स्तंभ क्र. 1 शी जुळेल याप्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.

    स्तंभ क्र. 1स्तंभ क्र. 2स्तंभ क्र. 3
    (1) त्रिकएकवटलेले अणुवस्तुमान व धनप्रभारथॉमसन
    (2) अष्टकेपहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरीन्यूलँड्स
    आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखेडोबेरायनर
    2 marks See answer →
  5. प्रश्न 2 (ब)(v) व्याख्या लिहा :
    (a) मुक्तिवेग
    (b) मुक्तपतन.

    2 marks See answer →

प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) (15 गुण)

  1. प्रश्न 3 (i) पुढील रासायनिक अभिक्रियेतून तुम्हाला कोणती माहिती मिळते ? ते लिहा.

    \[\mathrm{CaCO_{3(s)} \xrightarrow{\Delta} CaO_{(s)} + CO_2\uparrow}\]

    3 marks See answer →
  2. प्रश्न 3 (ii) खालील किरणाकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

    (आकृती: एकाच मुख्य अक्षावर दोन बहिर्वक्र भिंगे आहेत – डावीकडे लहान ‘पदार्थ भिंग’ (नाभी Fo) आणि उजवीकडे ‘नेत्रिका’ (नाभी Fe). ‘वस्तू’ पदार्थ भिंगाच्या नाभीच्या थोडी पलीकडे ठेवली आहे; पदार्थ भिंग दोन्ही भिंगांच्या मध्ये, नेत्रिकेच्या नाभीजवळ तिची उलटी प्रतिमा तयार करते. नेत्रिकेतून बाहेर पडणारे किरण मागे वाढविल्यावर डावीकडे खाली मोठी उलटी ‘प्रतिमा’ तयार झालेली दाखविली आहे.)

    (अ) आकृतीमधील उपकरण ओळखा.
    (ब) दोन भिंगाचा एकत्रित परिणाम काय असतो ?
    (क) वरील उपकरणाचा उपयोग लिहा.

    3 marks See answer →
  3. प्रश्न 3 (iii) खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

    इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन यांचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेंव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतात, तेंव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि त्यानंतर पुन्हा प्रकाशाचे अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम इंद्रधनुष्य होय.

    (अ) इंद्रधनुष्यासाठी कोणत्या तीन घटना आवश्यक आहेत ?
    (ब) अपवर्तन कसे घडून येते ?
    (क) इंद्रधनुष्य निर्मितीची आकृती रेखाटा.

    3 marks See answer →
  4. प्रश्न 3 (iv) आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांना अनुसरून खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

    (आकृती: दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांच्या चौकटी – डावीकडे Li (3, Lithium, 6.941) व Be (4, Beryllium, 9.012); मध्ये अंतर सोडून उजवीकडे B (5, Boron, 10.811), C (6, Carbon, 12.011), N (7, Nitrogen, 14.007), O (8, Oxygen, 15.999), F (9, Fluorine, 18.998) व Ne (10, Neon, 20.180). प्रत्येक चौकटीत अणुअंक, संज्ञा, नाव व अणुवस्तुमान दिले आहे.)

    (अ) दोनही कक्षा इलेक्ट्रॉनने भरलेले मूलद्रव्य कोणते ?
    (ब) दोनही कक्षेत समान इलेक्ट्रॉन असलेले मूलद्रव्य कोणते ?
    (क) या आवर्तनातील सर्वात जास्त विद्युत घनता असलेले मूलद्रव्ये कोणते ?

    3 marks See answer →
  5. प्रश्न 3 (v) गुरुत्व त्वरण ‘g’ चे मूल्य कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते ? ते स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  6. प्रश्न 3 (vi) संज्ञा स्पष्ट करा :
    (अ) धातुविज्ञान
    (ब) धातुके
    (क) मृदा अशुद्धी.

    3 marks See answer →
  7. प्रश्न 3 (vii) (a) भारताने प्रक्षेपित केलेल्या व सध्या कार्यरत असणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारण, दूरसंचार आणि हवामानशास्त्र सेवा यांच्याशी संबंधित उपग्रह मालिकेची नावे लिहा.
    (b) सध्या फक्त शिक्षणक्षेत्रात वापरली जाणारी उपग्रह मालिका कोणती ?
    (c) पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी कोणती उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे ?

    3 marks See answer →
  8. प्रश्न 3 (viii) (a) पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय ?
    (b) थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.

    3 marks See answer →

प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) (5 गुण)

  1. प्रश्न 4 (i) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

    (आकृती: ‘N’ व ‘S’ या चुंबकीय ध्रुवांच्या मध्ये ‘चुंबकीय क्षेत्र’ (N कडून S कडे बाण) असून त्यात ABCD हे ‘कुंडल’ ठेवलेले आहे; कुंडलाच्या भुजांवर A कडून B कडे व C कडून D कडे बाण दाखविले आहेत. कुंडलाची टोके ‘आस’ वर बसविलेल्या R1 व R2 या ‘विद्युतवाहक कडी’ ना जोडलेली आहेत. B1 व B2 हे ‘कार्बन ब्रश’ कड्यांना स्पर्श करतात आणि बाह्य परिपथात गॅल्व्हानोमीटरला जोडलेले आहेत; परिपथात विद्युतधारेची दिशा बाणांनी दाखविली आहे.)

    (अ) वरील आकृती कोणते उपकरण दर्शविते ? 1
    (ब) या उपकरणाचे कार्य कोणत्या तत्त्वावर चालते ? 1
    (क) या उपकरणाचे कार्य स्पष्ट करा. 2
    (ड) वरील उपकरणाचा उपयोग लिहा. 1

    5 marks See answer →
  2. प्रश्न 4 (ii) खालील उताऱ्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

    कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन (CH4). आपण मीथेनची संरचना आधीच पाहिली आहे. ईथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र C2H6 आहे.

    ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. एथीन व ईथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन–कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘अल्कीन’ म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन–कार्बन तिहेरी बंध असतो, अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना ‘अल्काईन’ असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.

    (अ) हायड्रोकार्बन म्हणजे काय ? 1
    (ब) सर्वात लहान हायड्रोकार्बनचे नाव लिहा. 1
    (क) व्याख्या लिहा–असंपृक्त संयुगे. 1
    (ड) अल्कीन व अल्काईन यामधील फरक स्पष्ट करा. 2

    5 marks See answer →