Chapter: Effects of Electric Current· Science & Technology Part 1
उत्तर:
(अ) उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम: विद्युतधारावाहक तार उजव्या हातात अशी धरा की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने असेल; तर तारेभोवती वळलेली बोटे चुंबकीय बलरेषांची (चुंबकीय क्षेत्राची) दिशा दर्शवतात.
(ब) फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम: डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील असे ताणा. तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने व मधले बोट विद्युतधारेच्या दिशेने असेल, तर अंगठा वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची (वाहकाच्या गतीची) दिशा दर्शवतो.