उत्तर : अर्थ व वाक्यांतील उपयोग खालीलप्रमाणे (कोणतेही दोन).
(i) कंबर कसणे – एखादे काम करण्यासाठी जिद्दीने तयार होणे.
वाक्य : दहावीच्या परीक्षेसाठी सुमेधाने सुरुवातीपासूनच कंबर कसली.
(ii) पाठ थोपटणे – शाबासकी देणे, कौतुक करणे.
वाक्य : चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्यावर सरांनी अमितची पाठ थोपटली.
(iii) तोंडचे पाणी पळणे – खूप घाबरणे.
वाक्य : जंगलात अचानक समोर अस्वल दिसताच प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळाले.
(iv) नाव कमावणे – कीर्ती मिळवणे, प्रसिद्ध होणे.
वाक्य : अपार कष्टांनी अरुणिमा सिन्हाने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नाव कमावले.