5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.प्रत्येक माणसाला एखादा तरी छंद असावा. छंद म्हणजे कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता केव…
5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)
विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
प्रत्येक माणसाला एखादा तरी छंद असावा. छंद म्हणजे कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता केवळ आनंदासाठी मनापासून केलेले काम. कोणाला चित्रे काढायला आवडते, कोणाला बागकाम करायला, तर कोणाला पुस्तके वाचायला. छंदामुळे रिकामा वेळ सत्कारणी लागतो आणि मन प्रसन्न राहते. अभ्यासाचा किंवा कामाचा ताण आला, की आवडत्या छंदात रमल्यावर तो ताण आपोआप हलका होतो.
छंदामुळे माणसाच्या अंगी चिकाटी, एकाग्रता आणि निरीक्षणशक्ती वाढते. पोस्टाची तिकिटे जमवणारा मुलगा नकळत अनेक देशांचा इतिहास-भूगोल शिकतो. बागकाम करणारी मुलगी झाडांची निगा राखताना संयम शिकते. कधी कधी हाच छंद पुढे व्यवसायाचे रूपही घेतो. मात्र छंदाचे व्यसन होऊ देऊ नये. मोबाईलवर तासन्तास खेळ खेळत बसणे हा छंद नव्हे, तर वेळेचा अपव्यय आहे. आपल्याला घडवणारा आणि निखळ आनंद देणारा छंदच खरा छंद होय.