उत्तर : (नमुना बातमी)
सरस्वती विद्यामंदिरात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
सांगली, दि. 27 फेब्रुवारी (वार्ताहर) : येथील सरस्वती विद्यामंदिरात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी पालखीत ग्रंथ ठेवून परिसरात दिंडी काढली.
सभागृहात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती मंगला देसाई यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी कविता-वाचन, अभिवाचन व ‘माझी मराठी’ या विषयावर भाषणे सादर केली. प्रमुख पाहुणे साहित्यिक श्री. विलास जोशी यांनी ‘मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठीत लिहा’ असे आवाहन केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सई कुलकर्णी हिने केले, तर आभार श्री. राजेश माने यांनी मानले.