1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)(1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)[आकृती : वर «शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या रेषांकडे जातात.]मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत…
1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)
(1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
[आकृती : वर «शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या रेषांकडे जातात.]
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.
(2) टीप लिहा : (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम