Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (Second/Third Language) Board Paper March 2024

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2024, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 2 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 6 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

Marathi Second/Third Language (अक्षरभारती) – March 2024

This is the actual Maharashtra State Board (MSBSHSE) SSC Marathi (16) Second or Third Language paper – the अक्षरभारती textbook paper, not the First Language (कुमारभारती) paper. The paper code printed on it is N 571 (header ‘2024 III 04 1100’, i.e. 4 March 2024, 11.00 a.m.), revised course, 16 pages.Source: the Maharashtra State Board's printed question paper (paper code N 571). The model answers are original Doubtly answers, not an official board answer key.

Paper pattern

3 hours, 80 marks, five sections: विभाग 1 गद्य (18 marks – activities on extracts from ‘उपास’ and ‘फूटप्रिन्टस’ and an unseen passage), विभाग 2 पद्य (16 marks – activities on ‘दोन दिवस’ and a table on any one of ‘अंकिला मी दास तुझा’ / ‘स्वप्न करू साकार’), विभाग 3 स्थूलवाचन (6 marks – any two), विभाग 4 भाषाभ्यास (16 marks – sentence types, transformation, वाक्प्रचार, word wealth, spelling, punctuation) and विभाग 5 उपयोजित लेखन (24 marks – letter or summary, any two of advertisement/news/story, and one long piece). Where the paper offers a choice, every option is answered here.

How to use it

Write the paper by hand in three hours, drawing the activity diagrams in pen as instructed, then compare with the model answers. Treat the letters, news report, story and essays as samples of format and content; your own wording will differ.

FAQs

Is this the First Language Marathi paper?

No. This is the Second/Third Language paper (Marathi 16, अक्षरभारती). The First Language paper (कुमारभारती) has a different code and syllabus.

Are the answers official?

No. The questions are the board's; the answers are written by Doubtly to help you practise.

Two marks figures were not fully visible in the scan – how were they filled?

The marks for Q.1 (अ)(2) and Q.5 (अ) are not clearly visible in the scanned copy; they are given here as 2 and 6, which is what the 80-mark total and the board pattern require.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

    “दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.

    (1) उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा. (2)
    (i) ..................
    (ii) ..................

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    (i) कार्डवर दाखवलेले वजन : – [ ]
    (ii) [आकृती : वरच्या चौकटीत «लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    (3) स्वमत : (3)
    वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    (1) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वर «रेखामावशींची कामे» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या रेषांकडे जातात.]

    अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता ?” हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.

    “अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ ?”

    “सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं.

    (2) चौकटी पूर्ण करा : (2)
    (i) दार उघडणारा – [ ]
    (ii) फरशी पुसणाऱ्या – [ ]
    (iii) अभिषेकचा आतेभाऊ – [ ]
    (iv) स्वच्छतेची भोक्ती – [ ]

    (3) स्वमत : (3)
    ‘सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    [आकृती : वर «शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या रेषांकडे जातात.]

    मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.

    (2) टीप लिहा : (2)
    स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    (1) एका शब्दात उत्तर लिहा : (2)
    (i) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट –
    (ii) कवीचा जवळचा मित्र –

    दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.
    हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
    शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
    भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

    हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
    कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
    हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
    तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

    दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
    दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
    झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
    दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.

    (2) कृती पूर्ण करा : (2)
    (i) कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
    (ii) ‘दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात’, या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

    (3) पुढील शब्दांचा अर्थ लिहा : (2)

    शब्दअर्थ
    1.दारिद्र्य..........
    2.हरघडी..........
    3.साहाय्य..........
    4.दुनिया..........

    (4) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. (2)

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांना अनुसरून कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (8 गुण)

    कृती‘अंकिला मी दास तुझा’किंवा‘स्वप्न करू साकार’
    (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री – (1)
    (2) प्रस्तुत कवितेचा विषय – (1)
    (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण – (2)
    (4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ – (2)‘वणवा लागलासे वनीं।
    पाडस चिंतीत हरणी॥’
    ‘या देशाच्या मातीवरती
    अमुचा रे अधिकार
    नव्या पिढीचे, नव्या युगाचे
    स्वप्न करू साकार’
    (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ – (2)(i) माता –
    (ii) कनवाळू –
    (iii) काज –
    (iv) धेनू –
    (i) विभव –
    (ii) शक्ती –
    (iii) विश्व –
    (iv) हस्त –
    8 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (i) टीप लिहा – डॉ. होमी भाभा. (3)

    3 marks See answer →
  2. 3. (ii) पणतीच्या उदाहरणातून ‘जाता अस्ताला’ या कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. (3)

    3 marks See answer →
  3. 3. (iii) ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. (3)

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) पुढील वाक्यांचा वाक्यप्रकार ओळखा : (2)
    (i) शाब्बास! चांगले काम केलेस तू!
    (ii) मुलांनो रांगेत चला.

    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा : (2)
    (i) ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.)
    (ii) जगात सर्व सुखी असा कोण आहे ? (विधानार्थी करा.)

    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन) : (4)
    (i) रममाण होणे
    (ii) झोकून देणे
    (iii) अंगाचा तिळपापड होणे.

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती : (4)

    (i) समानार्थी शब्द लिहा : (1)
    (I) झाड   (II) घर

    (ii) विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (I) प्रामाणिक   (II) सावध

    (iii) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : (1)
    समाजसेवा करणारा –

    (iv) पुढील शब्दांचे वचन बदला : (1)
    (I) रस्ता   (II) भिंत

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) अचूक शब्द ओळखून लिहा : (2)
    (i) गारहाणी / गाऱ्हाणि / गाऱ्हाणी / ग्राहाणी
    (ii) प्रक्रिया / परकिरया / प्रक्रीया / परक्रिया

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) पुढील विरामचिन्हांची नावे लिहा : (2)

    चिन्हनांव
    ?
    ;
    !
    ‘ ’

    (टीप : तक्त्याच्या शीर्षकात प्रश्नपत्रिकेत ‘नांव’ असेच छापले आहे; आजच्या लेखननियमांनुसार ‘नाव’.)

    2 marks See answer →

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन :

    ‘झाडे लावा........ झाडे जगवा.’
    हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे
    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
    [ रोपांचे मोफत वाटप ]
    संपर्क – हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे
    hirwaitrust04@gmail.com

    कुणाल/गायत्री पिंगळे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे. या नात्याने –

    [आकृती : «या नात्याने» यापासून दोन बाण निघतात. डावीकडील चौकट : «शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना» ; मध्ये «← किंवा →» ; उजवीकडील चौकट : «चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.»]

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग 1 – गद्य (इ) प्रश्न क्र. 1-इ मधील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश लिहा.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालील कृतींपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : (5 गुण)
    खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

    ( चला करूया भ्रमंती )
    फुलपाखरांच्या जगात
    ( नाव नोंदणी आवश्यक )
    त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!
    मोजक्याच जागा शिल्लक
    राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती!
    घेऊया फुलपाखरांच्या विश्वाचा रोमहर्षक अनुभव
    वयोगट : 10 ते 15, नोंदणी शुल्क – रु. 200/-
    कालावधी : 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर
    संपर्क : जंगल भ्रमंती संस्था, तापोळा
    (आयोजक)

    कृती करा :
    (1) जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क –
    (2) उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट –
    (3) उद्यानात फिरण्याचा कालावधी –
    (4) जंगल भ्रमंतीचे ठिकाण –
    (5) आयोजक संस्थेचे नाव –

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : (5 गुण)
    खालील विषयावर बातमी तयार करा :

    जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा
    प्रमुख पाहुणे – ज्येष्ठ साहित्यिक – श्री. अरविंद मोरे
    अध्यक्ष – श्री. सागर शिंदे
    दि. 27 फेब्रुवारी    वेळ – स. 10.00

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : (5 गुण)
    पुढील मुद्द्यांवरून कथालेखन करा.

    मुद्दे – एक राजा – त्याची प्रजा आळशी होती – त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो – रस्त्यात मधोमध दगड ठेवतो – त्यांच्याखाली – सोन्याची नाणी असलेली पिशवी – अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत – एक गरीब माणूस तो उचलतो – पिशवीतील नाणी त्याला मिळतात – लोकांना हे कळते – लोक उद्योगी बनतात –

    5 marks See answer →
  6. 5. (इ) निबंधलेखन : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    [आकृती : मध्यभागी «शालेय प्रजासत्ताक दिन» अशी चौकट; त्यातून चार बाण – वर «पूर्वतयारी», उजवीकडे «ध्वजारोहण», खाली «सांस्कृतिक कार्यक्रम», डावीकडे «मनोगते».]

    वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : (8 गुण)

    [आकृती : मध्यभागी «मी क्रीडांगण बोलतोय» अशी चौकट; डावीकडे «आनंद», «महत्त्व/गरज», «टीव्हीचा प्रभाव» आणि उजवीकडे «अतिक्रमण», «आजची स्थिती», «खंत» असे मुद्दे.]

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : (8 गुण)

    “मी माझ्या देशाचा नागरिक” या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

    मुद्दे : जबाबदार नागरिक – हक्क व कर्तव्ये यांची जाणीव – देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान – स्वतःचे वागणे – देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

    वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.

    8 marks See answer →