Answer: (कोणतेही दोन लिहावेत)
(i) रममाण होणे – एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होणे, रमून जाणे.
वाक्य : सुट्टीत आजोळी गेल्यावर सई शेतातल्या कामात रममाण झाली.
(ii) झोकून देणे – सर्व शक्तिनिशी, मनापासून एखाद्या कामात स्वतःला गुंतवणे.
वाक्य : पूरग्रस्तांच्या मदतकार्यात स्वयंसेवकांनी स्वतःला झोकून दिले.
(iii) अंगाचा तिळपापड होणे – खूप संताप येणे.
वाक्य : भिंतीवर कोणीतरी घाण केलेली पाहून मुख्याध्यापकांच्या अंगाचा तिळपापड झाला.